आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेवण करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक, जाणून घ्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निरोगी आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी आपण उत्तम आहार ग्रहण करणे आवश्यक आहे. आहाराशी संबंधित विविध खास गोष्टी धर्म ग्रंथांमध्ये सांगण्यात आल्या आहेत. या नियमांचे पालन केल्यास आरोग्य तसेच धर्म लाभ प्राप्त होऊ शकतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, जेवण करताना आणि बनवताना कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...


- कधीही ताटात वाढलेल्या अन्नाला नाव ठेऊ नयेत. असे केल्यास अन्नाचा अपमान होतो आणि ते खाल्ल्यास शरीराला कधीच उर्जा प्राप्त होत नाही. 


- जेवण करण्यापूर्वी देवी-देवतांचे किंवा अन्नपूर्ण मातेचे स्मरण करावे. सोबतच, अशी प्रार्थना करावी, की सर्व उपाशी लोकांना अन्न मिळो.


- पूर्व आणि उत्तर दिशेकडे तोंड करून जेवण करावे. या उपायाने आपल्या शरीराला अन्नाची जास्त उर्जा प्राप्त होते.


- दक्षिण दिशेला तोंड करून जेवण करणे अशुभ मानले जाते. पश्चिम दिशेला तोंड करून जेवण केल्यास रोगांमध्ये वृद्धी होते.


या स्थितीमध्ये जेवण करू नये
- पलंगावर बसून किंवा हातामध्ये ताट घेऊन कधीच जेवण करू नये.
- तुटलेल्या किंवा फुटलेल्या भांड्यातसुध्दा जेवण करू नये.
- उभे राहून जेवण करू नये. नेहमी बसूनच जेवण करावे.
- जेवणाचे ताट लाकडी पाटावर ठेवून मग जेवण करावे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...