आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधाकृष्णाचा फोटो लावावा बेडरूममध्ये, युद्धाचे फोटो घरात लावण्याचे नेहमी टाळावे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या व्यक्तीला खूप कष्ट करूनही यश प्राप्त होत नसेल तर त्याने वास्तुनुसार उपाय करावेत. वास्तुशास्त्रानुसार घरात छोटे-छोटे बदल केल्यास तुमाला मानसिक शांतता प्राप्त होऊ शकते. वास्तूच्या उपायांमुळे भाग्याशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात. घरामध्ये देवी-देवतांचे फोटो तर सर्वजणच लावतात परंतु वास्तूमध्ये सांगण्यात आलेल्या दिशेला देवतांचे फोटो लावल्याने जीवनात सुख-समृद्धी वाढते. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या वास्तू विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार घरामध्ये कोणत्या देवाचा फोटो कोणत्या दिशेला लावल्यास शुभफळ प्राप्त होतात...


> गरोदर स्त्रीच्या रूममध्ये श्रीकृष्णाचा बालस्वरूपातील किंवा एखाद्या सुंदर बाळाचा फोटो लावावा. अशा फोटोकडे वारंवार पाहिल्याने महिलेचे मन प्रसन्न राहते. मान्यतेनुसार गर्भावस्थेमध्ये श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाचे दर्शन केल्याने बाळही सुंदर होते.


> राधाकृष्णाच्या फोटो बेडरूममध्ये लावणे शुभ राहते.


> रामायण महाभारताच्या युद्धाचे दृश्य दर्शवणारे फोटो घरात लावू नयेत. वास्तुशास्त्रानुसार असे चित्र घरातील सदस्यांचा मानसिक ताण वाढवतात आणि यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये ताळमेळ राहत नाही.


> हनुमानाचा फोटो घरात लावायचा असल्यास दक्षिण दिशेकडे हनुमानाचे मुख असावे.


> स्वस्तिक, कमळाचे फुल, पुष्पगुच्छ असे फोटो आणि खेळणी घरात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते.


> महादेव, कुबेरदेव, गंधर्वदेव यांचे फोटो उत्तर दिशेला लावावेत.


> महालक्ष्मी, देवी दुर्गा, सरस्ववती यांचे फोटो लावण्यासाठी उत्तर दिशा सर्वोत्तम आहे.


> देवी महालक्ष्मी बसलेल्या स्वरूपात असावी. असा फोटो घरामध्ये शुभ राहतो.


> देवी दुर्गाच्या फोटोमध्ये वाघाचे मुख उघडे असू नये.


घरामध्ये वाढेल सकारात्मकता 
योग्य दिशेला देवी-देवतांच्या मूर्ती ठेवल्याने घरामध्ये सकारात्मकता वाढते आणि वास्तुदोष दूर होऊ शकतात

बातम्या आणखी आहेत...