Home | Business | Gadget | Myths about battery of mobile phone and charging of it

तुमच्या खिशातील मोबाईलच्या बॅटरीबाबत सर्रास बोलले जाते हे खोटे, वाचा अशाच 5 गोष्टी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 05, 2018, 12:05 AM IST

चार्जर चांगले काम करत असेल तोपर्यंत बॅटरीला काहीही नुकसान होणार नाही, मग चार्जर कोणत्याही कंपनीचे असले तरी.

 • Myths about battery of mobile phone and charging of it

  नवी दि‍ल्‍ली - स्‍मार्टफोनची बाजारपेठ दिवसेंदिवस मोठी होत आहे. आजघडीला प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. पण स्मार्टफोन वापरणाऱ्यांची सर्वात मोठी अडचण म्हणजे, बॅटरी. कारण जर तुम्ही इंटरनेट सुरू ठेवले असेल तर बॅटरी दिवसभर चालणेही कठीण ठरते. त्यामुळे स्मार्टफोनसाठी सर्वात महत्त्वाचा पार्ट बॅटरी ठरतो आणि त्यामुळे त्याची निगा राखणेही गरजेचे आहे. पण मोबाईल बॅटरीबाबत अनेक भ्रामक गोष्टी पसरलेल्या आहेत. तसे असले तरी जोपर्यंत तुमचे चार्जर चांगले काम करत असेल तोपर्यंत बॅटरीला काहीही नुकसान होणार नाही, मग चार्जर कोणत्याही कंपनीचे असले तरी. पण जर चार्जरच खराब असेल तर बॅटरी खराब होऊ शकते.


  1. गैरसमज काय
  जास्त चार्ज केल्याने बॅटरी खराब होते..
  सत्य काय
  नेहमी असे म्हटले जाते की, जास्त चार्ज केल्याने बॅटरी खराब होते. पण हे सत्य नाही. कारण सध्या येणाऱ्या स्मार्टफोनमधील बॅठरी चार्जिंग फुल झाल्यास स्वतःच करंट घेणे बंद करतात. त्यामुले हे सत्य नाही. पण सारखी चार्जिंग सुरू राहिल्यास वीज नक्कीच वाया जाते.

  पुढे वाचा, बॅटरीबाबतचे इतर काही गैरसमज..

 • Myths about battery of mobile phone and charging of it

  2. गैरसमज काय.. 
  बॅठरी पूर्ण संपल्यानंतरच चार्जिंग करायला हवी. 

  सत्य काय? 
  ही अत्यंत चुकीची बाब आहे. जर तुम्हीही असा विचार करत असाल आणि बॅटरी चार्ज करण्यासाठी ती शून्य टक्के होईपर्यंत वाट पाहत असाल तर तसे करू नका. त्यामुळे बॅटरी लाइफ कमी होते. 


   

 • Myths about battery of mobile phone and charging of it

  3. गैरसमज काय.. 
  वारंवार फोन स्विच ऑफ केल्याने बॅटरी खराब होते.. 
  सत्य काय.. 
  असे काही होत नाही. उलट जर तुम्ही फोन स्विच ऑफ केला तर ठरावीक वेळेनंतर बॅटरी आपोआप बंद होतच असते. 

   

 • Myths about battery of mobile phone and charging of it

  4. गैरसमज काय.. 
  वारंवार चार्जिंग केल्याने खराब होते बॅटरी.. 
  सत्य काय.. 
  स्‍मार्टफोनचा बॅटरीबॅकअप कमी असतो. त्यात इंटरनेटचा वापर आणि इतर फिचर्समुळे बॅटरी लवकर संपते. त्यामुळे वारंवार बॅटरी चार्जिंग करावी लागते. पण त्याचा बॅटरीवर काहीही परिणाम होत नाही. 

 • Myths about battery of mobile phone and charging of it

  5. गैरसमज काय.. 
  नवीन पोनला स्विच ऑफ करून चार्जिंग करावी.. 
  सत्य काय.. 
  नवीन पोन घेतल्यानंतर तो स्विच ऑफ करून चार्जिंग करण्याचा सल्ला कोणी दिली तर तसे करायची गरज नाही. त्याचा काहीही फायदा होत नाही. उलट फोन घेताना बॅटरीमध्ये जेवढा पॉवर असेल तो वापरून नंतर पुन्हा मोबाईल चार्ज करावा. तेव्हाही फोन ऑफ करण्याची गरज नाही. 

Trending