Home | Gossip | Naagin 3 actress pavitra punia glamorous photoshoot in saari

नागिन 3 फेम अभिनेत्रीने साडीत केले ग्लॅमरस फोटोशूट, व्हायरल होत आहेत फोटो

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 13, 2019, 01:39 PM IST

या मालिकेत लवकरच झळकणार अभिनेत्री

 • Naagin 3 actress pavitra punia glamorous photoshoot in saari

  टीव्ही डेस्क - नागिन 3 मध्ये झळकलेली अभिनेत्री पवित्रा पुनिया अलिकडे केलेले फोटोशूट चर्चेचा विषय बनला आहे. पवित्रा आपल्या या स्टनिंग लुक आणि फॅशन स्टेटमेंटमुळे सोशल मीडियावर ओळखली जाते. तिने नुकतेच केलेले फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले. तिचे हे फोटोज चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहेत.


  पवित्रा डार्क मोव रंगाची सुंदर साडी आणि हाल्टर नेक ब्लाउजमध्ये स्टनिंग खूपच आकर्षक दिसत आहे. तिचा हा भारतीय पेहराव घायाळ करणारा आहे. नागिन 3 मध्ये देखील ती ट्रेंडी साड्यांमध्ये दिसत होती.


  लवकरच झळकणार या मालिकेत
  हे फोटो शेअर करत पवित्राने सांगितले की, ती लवकरच 'डायन' या मालिकेत दिसणार आहे. पवित्राला नागिन 3 मध्ये प्रेक्षकांनी चांगलेच पसंत केले होते. या मालिकेत तिने माहिरच्या सावत्र आईची भूमिका निभावली होती. पवित्राचा चुलबुला अंदाज आणि हल्की फुल्की कॉमेडीने तिला प्रेक्षकांच्या पसंतीचे बनवले होते. पवित्रा सोशल मीडिया नेहमीच अॅक्टीव्ह असते. इंस्टावर तिचे स्टनिंग फोटोज नेहमीच दिसून येतात.


  प्रतिक सेजपालला करतीये डेट
  गेल्या काही दिवसांपासून पवित्रा ब्रेकअपमुळे चर्चेत होती. ब्रेकअपनंतर तिने एक्स बॉयफ्रेंड पासर छाबडाला आपला चांगला मित्र असल्याचे सांगितले होते. आता ती एस ऑफ स्पेस फेम प्रतिक सेजपालला डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत. BCL मध्ये दोघांची भेट झाली होती.


  2015 मध्ये बिझनसमनसोबत केला होता साखरपुडा
  पारस छाबडाला डेट करण्यापूर्वी पवित्राचे बिझनसमन सुमित महेश्वरीसोबत अफेयर होते. दोघांनी 2015 मध्ये दोघांनी साखरपुडा केला होता. त्यांचे लग्न देखील होणार होते. पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले.

Trending