आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदाल, रऑजर फेडरर, मारिया शारापोवा विजयी, ऑगुतने केली मरेवर ३-१ ने मात, मरेचे पॅकअप...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्ण- जगातील माजी नंबर वन राफेल नदाल, रऑजर फेडरर ऑणि मारिया शारापोवाने यंदाच्या सत्रातील पहिल्या ग्रँडस्लॅम किताब जिंकण्याच्या ऑपल्या मोहिमेला दमदार सुरुवात केली. या दोघांनी सोमवारी ऑॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत ऑपापल्या गटात शानदार विजयी सलामी दिली.  एंजेलिक कर्बरसह वोज्नियाकीनेही महिला गटात सलामी सामना जिंकला. यासह त्यांनी दुसऱ्या फेरीत दिमाखदारपणे प्रवेश केला.  राबर्टा बतिस्टा ऑगुतने सलामीला इंग्लंडच्या मरेवर ६-४, ६-४, ६-७, ७-६ मात केली.


तिसऱ्या मानांकित वोज्नियाकीने एकतर्फी विजयाची नोंद केली. तिने सलामीला वानचा पराभव केला. तिने ६-३, ६-४ ने  सामना जिंकला.    


तसेच ऑॅस्ट्रेलियाच्या बार्टीने विजयी सलामी दिली. तिने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत कुमखुमवर सरळ दोन सेटमध्ये मात केली. तिने ६-२, ६-२ ने विजय नोंदवला. दुसऱ्या मानांकित कर्बरनेही  विजयाची नोंद केली. तिने हेकाँगचा पराभव केला. जर्मनीच्या टेनिसपटूने ६-२, ६-२  ने विजय संपादन केला. २२ व्या मानांकित ओस्तापेंकोला पराभवाचा सामना करावा लागला. तिला साकारीने  नमवले. साकारीने ६-१, ३-६, ६-२ ने सामना जिंकला. 


फेडरर २० व्यांदा दुसऱ्या फेरीत : स्वीसकिंग फेडररने २० व्यांदा या स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. त्याने डेनिसवर ६-३, ६-४, ६-४ ने मात केली. 

बातम्या आणखी आहेत...