नगरची जागा काँग्रेसकडे; / नगरची जागा काँग्रेसकडे; पवारांचे हाे, पाटलांचे ‘नाे’; राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय व प्रदेशाध्यक्षांमध्येच मतभिन्नता

नगर लाेकसभा मतदारसंघ काँग्रेसला साेडण्यास राष्ट्रवादी काँग्रेस राजी  असल्याचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी अकलूजमध्ये सांगितले.

Mar 02,2019 10:22:00 AM IST

अकलूज/ मुंबई - आघाडीतील जागावाटपात आडकाठी बनलेला नगर लाेकसभा मतदारसंघ काँग्रेसला साेडण्यास राष्ट्रवादी काँग्रेस राजी असल्याचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी अकलूजमध्ये सांगितले. मात्र पवारांच्या प्रतिक्रियेनंतर काही वेळातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘असा काही निर्णय झाला नाही’ असे स्पष्टीकरण मुंबईतून दिले. त्यामुळे या जागेबाबतच संभ्रम अद्याप कायम आहे.


विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांच्यासाठी काँग्रेसला हा राष्ट्रवादीकडील मतदारसंघ हवा आहे. त्यामुळे आघाडीचे जागावाटपही रखडलेले आहे. विखेंना जागा साेडणार का, असा प्रश्न अकलूजमध्ये पत्रकारांनी विचारला असता पवारांनी ‘हाेय’ म्हणत मान डाेलावली. दरम्यान, याबाबत काहीच निर्णय कळाला नसल्याचे विखे पाटील म्हणाले.


माेहितेंना राज्यसभेवर संधी
खासदार विजयसिंह माेहिते पाटील यांची उमेदवारी कापून शरद पवार यंदा माढ्यातून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे माेहितेंच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता पवार म्हणाले, ‘माेहिते पाटीलही माझ्यासाेबत संसदेत दिसतील,’ असे सांगत त्यांनी माेहितेंना राज्यसभेवर घेण्याचे संकेत दिले. परंतु विजयसिंह व मुलगा रणजितसिंह यापैकी काेण संसदेत दिसेल, या प्रश्नावर ‘ते मी ठरवून सांगताे,’ असे माेघम उत्तर पवारांनी दिले.

X