आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक नियम मोडल्याबद्दल नागालँडच्या एका ट्रकला साडेसहा लाख दंड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वर । नागालँडच्या एका ट्रकने वाहतूक नियम मोडल्याबद्दल ओडिशात चक्क ६ लाख ५३ हजार रुपयांचे चलन फाडण्यात आले. जुन्या वाहतूक नियमानुसार आकारलेल्या या दंडाचा प्रकार शनिवारी समोर आला. कर चुकवेगिरीबद्दल हा दंड आहे. ट्रकचे मालक शैलेश शंकर गुप्त व चालक दिलीप कर्ता यांच्या नावे ही पावती फाडण्यात आली. नवे वाहतूक नियम लागू झाल्यापासून नवनवीन प्रकार समोर येत असून यातील बहुतेक दंड जुन्या नियमांनुसारच आहेत.