आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagama Harassment News In Marathi, Congress Candidate

गैरवर्तवणूकीने नगमा हैराण, आधी आमदार आता कार्यकर्ता, नगमाने कानाखाली लगावली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिरत- अभिनेत्री नगमा कार्यकर्त्यांच्या गैरवर्तवणुकीने हैराण झाली आहे. काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसच्याच एका आमदाराने भरसभेत नगमाचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला होता. आता कार्यकर्त्यांनी गैरवर्तवणूक केल्याने संतापलेल्या नगमाने चक्क एका कार्यकर्त्याच्या कानाखाली जाळ काढला.
नगमा मिरत येथून कॉंग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवित आहे. प्रचारासाठी सध्या ती मिरतलाच थांबली आहे. दररोज ती प्रचार रॅलीमध्ये सहभागी होत आहे. परंतु, जवळपास रोजच तिला गैरवर्तवणुकीला सामोरे जावे लागत आहे. गैरवर्तवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी तिने बाऊंसर आणि खासगी सुरक्षा रक्षक ठेवले आहेत. तरीही तिला या प्रकारांना सहन करावे लागत आहे. नगमा आज प्रचार करीत असताना काही कार्यकर्त्यांनी तिच्यासोबत गैरवर्तवणूक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतापलेल्या नगमाने एका कार्यकर्त्याच्या कानाखाली लगावली तर काही कार्यकर्त्यांना जोरदार ढकलण्याचा प्रयत्न केला.
यासंदर्भात नगमा म्हणाली, की जर असेच प्रकार वारंवार होत राहिले तर मी मिरतला परत येणार नाही.
कॉंग्रेसच्या आमदाराने नगमाचे चुंबन घेण्याचा केला होता प्रयत्न... वाचा पुढील स्लाईडवर