आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagama News In Marathi, Congress Legislator Manhandles Nagma

VIDEO नगमाचे चुंबन घेण्याचा कॉंग्रेस आमदाराने भरसभेत केला प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिरत (उत्तर प्रदेश)- कॉंग्रेस पक्षाची उमेदवार आणि अभिनेत्री नगमा हिच्यासोबत तिच्याच पक्षाचे आमदार गजराजसिंह यांनी प्रचार रॅलीत गैरवर्तवणूक केली. यावेळी त्यांनी नगमाचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नगमा ही रॅली सोडून निघून गेली. हा संपूर्ण प्रकार काही वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी कॅमेऱ्यात कैद केला. दरम्यान, कॉंग्रेस पक्षाकडून गजराजसिंह यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नगमा हापूर परिसरात प्रचार करीत होती. यावेळी येथील आमदार गजराजसिंह यांनी तिचा चेहरा हाताने पकडून चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वारंवार असा प्रयत्न केला. परंतु, या प्रकाराला विरोध करीत नगमा तेथून बाहेर पडली. यावेळी कोणत्याही कॉंग्रेस नेत्याने किंवा कार्यकर्त्याने संबंधित प्रकाराला विरोध केला नाही. घडलेल्या प्रकारामुळे नगमा बरीच चिडलेली दिसत होती. त्यानंतर एका जीपमध्ये बसून ती तेथून निघून गेली.
मिरत मतदारसंघातून नगमा निवडणूक रणांगणात उतरली आहे. हापूर परिसर या मतदारसंघात येतो. येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आणि गुरुद्वारात दर्शन घेण्यासाठी नगमा गेली होती. यावेळी हा प्रकार घडला.
याबाबत गजराजसिंह यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु, नगमा म्हणाली, की असा कुठलाही प्रकार घडलेला नाही. हे सगळे खोटे आहे. असे वृत्त कसे काय पसरविले जाते.
या प्रकाराचा व्हिडिओ बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा....
या प्रकाराबद्दल आपल्याला काय वाटते, आपल्या अमुल्य प्रतिक्रिया द्या. आमच्या फेसबुक पेजलाही भेट द्या.