आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच्या घनकचरा विभागातील 21 कर्मचाऱ्यांचे सेवानिलंबन अखेर रद्द 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- कामावर गैरहजर राहिल्याप्रकरणी घनकचरा विभागातील २१ कर्मचाऱ्यांचे ४ जानेवारीला निलंबन करण्यात आले होते. परंतु, त्यानंतर कर्मचारी कामावर रुजु होण्यास तयार झाल्यानंतर मनपा प्रशासनाने निलंबनाचा आदेश रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना पुनर्स्थापना दिली आहे. दरम्यान, गैरहजर कालावधीत बिनपगारी रजा करण्यात आली आहे. 

 

घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत कामाच्या सोयीसाठी बदलीचे आदेश देण्यात आले होते. परंतु, मुळ पदावर कर्मचारी रुजु झाले नाहीत. मुळ पदस्थापना ही सफाई कामगार असल्याने कामावर हजर होण्याबाबत नोटिसही प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांना बजावली होती. तथापि, कामावर रुजु न झाल्याने २१ कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करत निलंबन केले होते. त्यानंतर मुळ पदावर काम काम करण्यास कर्मचाऱ्यांनी सहमती दर्शवली आहे. परंतु, कामाबाबत झालेल्या निष्काळजीप्रकरणी गैरहजर कालावधीत हा असाधारण (बिनपगारी) रजा करण्यात आला आहे. तसेच निलंबन कालावधीही असाधारण रजा करून रुजु करून घेतले आहे. शुक्रवारी सर्व कर्मचाऱ्यांना आदेश कळवून सफाई कामगार पदावर रुजु झाल्याचा अहवाल सादर करण्याचेही निर्देश दिले आहेत. शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत मनपा कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे व माजी नगरसेवक दीप चव्हाण मनपात अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. 
 

बातम्या आणखी आहेत...