आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नगर दौऱ्यावर , बडतर्फ १८ नगरसेवक आज प्रदेशाध्यक्षांच्या दरबारात!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मंगळवारी (२२ जानेवारी) नगर दौऱ्यावर येणार आहेत. महापौर निवडणुकीत बंडखोरी केल्याने बडतर्फ केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचेे १८ नगरसेवक त्यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. प्रदेशाध्यक्ष त्यांना वेळ देणार का? आणि दिलाच तर बडतर्फ नगरसेवकांबाबत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या जागेसह विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी दुपारी दीड वाजता पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवनात होणार आहे. अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके असतील. पक्षाचे सर्व तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांशी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीबाबत बैठकीत चर्चा केली जाणार आहे. त्याबरोबरच जिल्ह्यातील माजी खासदार, आजी-माजी आमदार, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा प्रतिनिधी, सर्व फ्रंटल प्रमुख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष व संचालक, जिल्हा पदाधिकारी, पक्षाचे जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य, पंचायत समिती सभापती व सदस्य, सर्व नगरपालिकांचे नगराध्यक्ष, पदाधिकारी व नगरसेवक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व महत्त्वाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत. 

महापालिका निवडणुकीत भाजपला पाठिंबा न देण्याचा पक्षाचा स्पष्ट आदेश असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला होता. या पाठिंब्याच्या जोरावर मनपात प्रथमच महापौर व उपमहापौरपद भाजपला मिळाले. या घडामोडींमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मनपाच्या सत्तेत वाटा न घेता भाजपला बाहेरून पाठिंबा दिला असला, तरी पक्ष पातळीवरून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली. सर्व नगरसेवकांना नोटिसा बजावून खुलासे सादर करण्याचेही आदेश देण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी नगर दौऱ्यावर आलेल्या पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी याप्रकरणी कठोर कारवाईचे संकेत दिले होते. दरम्यान, राष्ट्रवादीच्या १८ नगरसेवकांनी पक्षाकडे खुलासे सादर केले. परंतु प्रदेश स्तरावरून खुलासे सादर न केल्याचे स्पष्ट करून १८ नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले. 

या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या मध्यस्थीने १८ नगरसेवक बाजू मांडण्यासाठी मंुबईला जाणार होते. पण आता मंगळवारी प्रदेशाध्यक्ष स्वत:च नगर दौऱ्यावर येणार असल्याने १८ नगरसेवक आमदार जगताप यांच्या मध्यस्थीने त्यांच्या भेटीसाठी वेळ मागणार असल्याचे काही कार्यकर्त्यांनी सांगितले. पाटील यांनी भेटीसाठी वेळ दिला, तर त्यात मनपा महापौर निवडणुकीसह शहरात यापूर्वी घडलेल्या घटनांची पार्श्वभूमी सांगितली जाईल. त्यामुळे १८ नगरसेवकांबाबत पाटील कोणती भूमिका घेणार? याकडे शहरासह राज्याचे लक्ष लागले आहे. 

लोकसभा मतदारसंघाबाबतही होणार चर्चा 
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत नगर दक्षिणेची यापूर्वीपासून राष्ट्रवादीकडे आहे, पण या जागेसाठी काँग्रेसचे युवा नेते डॉ. सुजय विखे इच्छुक आहेत. त्यामुळे नगरची जागा राष्ट्रवादीकडेच राहणार की, काँग्रेसला सोडणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीच सर्व जागांवर वापरलेल्या सूत्राप्रमाणे ही जागा राष्ट्रवादीकडे राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या बैठकीत होणाऱ्या चर्चेकडे लक्ष लागले आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची फौज 
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेकजण इच्छुक आहेत. त्यात प्रशांत गडाख, माजी आमदार नरेंद्र घुले, अॅड. प्रताप ढाकणे, दादा कळमकर, माजी कुलगुरु डॉ. सर्जेराव निमसे आदींची नावे चर्चेत आहेत. दुसरीकडे काँग्रेसने नगरच्या जागेची मागणी केली आहे. तथापि, राष्ट्रवादीकडेही इच्छुकांची मोठी फौज असल्याने पक्ष काय निर्णय घेणार हा विषय नगर जिल्ह्यासाठी मोठ्या आैत्सुक्याचा ठरला आहे. 

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मंगळवारी (२२ जानेवारी) नगर दौऱ्यावर येणार आहेत. महापौर निवडणुकीत बंडखोरी केल्याने बडतर्फ केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचेे १८ नगरसेवक त्यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. प्रदेशाध्यक्ष त्यांना वेळ देणार का? आणि दिलाच तर बडतर्फ नगरसेवकांबाबत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या जागेसह विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी दुपारी दीड वाजता पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवनात होणार आहे. अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके असतील. पक्षाचे सर्व तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांशी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीबाबत बैठकीत चर्चा केली जाणार आहे. त्याबरोबरच जिल्ह्यातील माजी खासदार, आजी-माजी आमदार, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा प्रतिनिधी, सर्व फ्रंटल प्रमुख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष व संचालक, जिल्हा पदाधिकारी, पक्षाचे जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य, पंचायत समिती सभापती व सदस्य, सर्व नगरपालिकांचे नगराध्यक्ष, पदाधिकारी व नगरसेवक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व महत्त्वाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत. 

महापालिका निवडणुकीत भाजपला पाठिंबा न देण्याचा पक्षाचा स्पष्ट आदेश असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला होता. या पाठिंब्याच्या जोरावर मनपात प्रथमच महापौर व उपमहापौरपद भाजपला मिळाले. या घडामोडींमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मनपाच्या सत्तेत वाटा न घेता भाजपला बाहेरून पाठिंबा दिला असला, तरी पक्ष पातळीवरून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली. सर्व नगरसेवकांना नोटिसा बजावून खुलासे सादर करण्याचेही आदेश देण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी नगर दौऱ्यावर आलेल्या पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी याप्रकरणी कठोर कारवाईचे संकेत दिले होते. दरम्यान, राष्ट्रवादीच्या १८ नगरसेवकांनी पक्षाकडे खुलासे सादर केले. परंतु प्रदेश स्तरावरून खुलासे सादर न केल्याचे स्पष्ट करून १८ नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले. 

या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या मध्यस्थीने १८ नगरसेवक बाजू मांडण्यासाठी मंुबईला जाणार होते. पण आता मंगळवारी प्रदेशाध्यक्ष स्वत:च नगर दौऱ्यावर येणार असल्याने १८ नगरसेवक आमदार जगताप यांच्या मध्यस्थीने त्यांच्या भेटीसाठी वेळ मागणार असल्याचे काही कार्यकर्त्यांनी सांगितले. पाटील यांनी भेटीसाठी वेळ दिला, तर त्यात मनपा महापौर निवडणुकीसह शहरात यापूर्वी घडलेल्या घटनांची पार्श्वभूमी सांगितली जाईल. त्यामुळे १८ नगरसेवकांबाबत पाटील कोणती भूमिका घेणार? याकडे शहरासह राज्याचे लक्ष लागले आहे. 

खुलाशाचा शोध लागेना 
महापौर निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रदेशस्तरावरून १८ नगरसेवकांना नोटिसा बजावून खुलासे मागितले होते. त्यानुसार नगरसेवकांनी खुलासे दिले होते. तथापि, खुलासे न दिल्याचे कारण पुढे करून प्रदेश स्तरावरून या नगरसेवकांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. नगरसेवकांनी दिलेले खुलासे कुठे गायब झाले ? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. याचा शोध लावण्याबाबत कोणीही आग्रह धरताना दिसत नाही. 

बातम्या आणखी आहेत...