आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

   ही खास भूमिका साकारणार आहेत नागार्जुन, खुदा गवाह-अग्नि वर्षानंतर अमिताभसोबतचा हा तिसरा चित्रपट 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः दिग्दर्शक अयान मुखर्जींच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार नागार्जुनची एन्ट्री झाली आहे. या चित्रपटात ते पुरातत्वशास्त्रज्ञाची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटात आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्यासोबत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे 1992 मधील 'खुदा गवाह' आणि 2002 मधील 'अग्नि वर्षा' या चित्रपटांमध्ये नागार्जुन आणि अमिताभ यांनी एकत्र काम केले होते.  'ब्रह्मास्त्र' हा या दोघांचा तिसरा चित्रपट आहे.

  • वाराणसीमध्ये केले चित्रीकरण

मुंबई मिररच्या वृत्तानुसार, नागार्जुन यांनी जून महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाला वाराणसीमध्ये सुरुवात कोली होती. चित्रपटात ते त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत गंगा नदीच्या किना-यावर असलेल्या एका मंदिराच्या पुननिर्माण करण्यासाठी जातात. 

  • अशी असेल चित्रपटाची स्टोरीलाइन

चित्रपटाच्या कथेतील एक घटना शिवा आणि ईशाला नागार्जुनकडे घेऊन जाते. येथेच कथेत ट्विस्ट येतो. चित्रपटात मौनी रॉय आणि सौरव गुर्जर यांची येथे एन्ट्री होते. चित्रपटातील काही भाग वाराणसीवर आधारित आहे.

  • 2020 मध्ये रिलीज होणार चित्रपट

ब्रह्मास्त्र हा चित्रपट पुढील वर्षी मे महिन्यात रिलीज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चित्रपटाचे चित्रीकरण  बुल्गारिया, लंडन, एडिनबर्ग आणि वाराणसीमध्ये झाले. चित्रपटाचा ऑफिशिअल लोगो मार्च 2019 मध्ये महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर कुंभ मेळ्यात रिलीज करण्यात आला होता.