आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Nagarjuna's Office Did Not Had Any Income Tax Department Raid, He Wrote On Twitter, 'No Red Has Fallen ...'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागार्जुन यांच्या ऑफिसवर नाही पडला आयकर विभागाचा छापा, ट्विटरवर लिहिले - 'कोणतीही रेड पडली नाही...'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : साउथचे सुपर स्टार नागार्जुन यांनी ट्वीट करून त्यांच्या ऑफिसवर झालेल्या आयटी रेडच्या अफवांचे खंडन केले आहे. नागार्जुन यांच्या हैदराबाद येथील ऑफिसवर आयटी रेड पडल्याच्या बातम्या येत आहेत. त्यानंतर नागार्जुन यांनी ट्विटरवर लिहिले आहे, 'माझ्यावर किंवा माझ्या ऑफिसवर कोणताही छापा पडलेला नाही. या केवळ अफवा आहेत.' 

लोकांनी विश्वास ठेऊ नये...  


नागार्जुन अक्किनेनी यांनी ट्वीट केले - 'माझ्या काही मित्रांनी मला फोन केला होता आणि मला विचारात होते की, माझ्याकडे आयकर विभागाचा छापा पडला आहे का. ही माझ्यासाठीच बातमी आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कोणताही छापा माझ्यावर किंवा माझ्या ऑफिसवर पडलेला नाही.' 

यामुळे उडाली अफवा... 


अशातच आयकर विभागाने प्रोड्यूसर सुरेश बाबू आणि अभिनेता नानी यांच्या ऑफिसवर कर चोरीच्या प्रकरणी छापा टाकला होता. ज्यांच्यासोबत नागार्जुन यांचे नाव जोडून ही बातमी पसरवली गेली की, त्यांच्या अन्नपूर्णा स्टूडियोमध्येही आयटीची धाड पडली आहे.  

'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहेत नागार्जुन... 


नागार्जुन यांच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर ते रणबीर, आलिया आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत अयान मुखर्जीचा चित्रपट 'ब्रह्मास्त्र' मध्ये दिसणार आहेत. तसेच अशातच त्यांनी बिग बॉस तेलगुचे तीसरे सीजन होस्ट केले आहे.