आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेरठ : कॉँग्रेसच्या नगमाला कॉँग्रेसींचेच भ्याव!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरठ - तिला नेत्याचे रुप हवे आहे. लोक तिला अभिनेत्रीच्याच रुपात पाहू इच्छितात. ती राजकीय मुद्यांवर गांभीर्याने बोलते, तेव्हा लोक अशा टाळ्या वाजवितात, की तिने चित्रपटातील संवाद सादर केला आहे. मेरठमधील कॉँग्रेसच्या उमेदवार नगमा यांच्यापुढे विरोधक तर नंतर अडथळे निर्माण करतात. तिच्याच पक्षाचे नेते आणि कार्यकर्तेच तिच्यासाठी पहिला धोका बनलेले आहेत. पहिले कॉंग्रेसचे आमदार गिरीराज सिंह यांनी आक्षेपार्ह वर्तन केले. त्यांनतर पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी छेडछाड. रागाने नगमाला हात उचलावा लागला. या घटनांच्या चित्रफितीही चांगल्याच चर्चेत राहिल्या.
ही परिस्थिती नगमासाठी नवीन नाही. दोन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतही एका उमेदवाराने स्थानिक प्रचारसभेत पाच मिनिटे तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली. यावेळी नगमाने सुरक्षा यंत्रणाच तैनात केली. मेरठ-हरिद्वार वळणमार्गावरील शहराच्या एकमेव पंचतारांकित हॉटेलमध्ये तीन कक्ष आरक्षित केले. कारण तेथे र्मयादित लोकांनाच प्रवेश दिला जातो. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांनंतर ती कारमधून फारच क्वचित खाली उतरते. सनरुफमधूनच ती मतदारांना अभिवादन करते. भाषणही तेथूनच. ती सांगते- मला लोकांना भेटणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आवडते. पण दु:ख होते, जेव्हा लोक मी काय बोलते ते ऐकण्यापेक्षा माझ्याकडे पाहण्यातच धन्यता मानतात. नगमा कितीही गांभीर्याने बोलत असली, तरी लोकांचे मत वाहनांचे सुटे भाग विकणार्‍या मोहम्मद हाफिजच्या बोलण्यातून जाणवते. ते म्हणतात, नगमा आतापर्यंत मुंबईत राहिलेली आहे. तिला आमच्या शहराबाबत काही माहिती नाही, की कोणत्या मुद्यांवरून दंगली होतात व कोणत्या मुद्यांवरून विद्यार्थ्यांची आंदोलने. तसेही यावेळी कॉँग्रेस निवडणुकीत मागेच आहे. खरी लढत तर भाजप आणि बसपामध्येच आहे.

पुढील स्लाइडमध्ये, वडील हिंदू आई मुस्लिम जन्म ख्रिसमसमधील