Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | Nagpanchami 2018 know the epic story of snakes

कशी झाली नागांची उत्पत्ती, का आहेत जीभीचे दोन भाग आणि कोणी दिला होता यज्ञामध्ये भस्म होण्याचा शाप?

रिलिजन डेस्क | Update - Aug 15, 2018, 12:02 AM IST

आज (15 ऑगस्ट, बुधवार) नागपंचमीचा सण आहे. विविध ग्रंथामध्ये नागांशी संबंधित अनेक कथा सांगण्यात आल्या आहेत.

 • Nagpanchami 2018 know the epic story of snakes

  आज (15 ऑगस्ट, बुधवार) नागपंचमीचा सण आहे. विविध ग्रंथामध्ये नागांशी संबंधित अनेक कथा सांगण्यात आल्या आहेत. महाभारताच्या आदी पर्वामध्ये नागांच्या उत्पत्ती आणि राजा जन्मेजयने केलेल्या नागदाह यज्ञाशी संबंधित कथेचे वर्णन आहे. ही कथा अत्यंत रोचक आहे. आज आम्ही तुम्हाला नाग वंशच्या उत्पत्तीशी संबंधित तीच कथा सांगत आहोत.


  अशी झाली नाग वंशाची उत्पत्ती
  महाभारतानुसार, महर्षी कश्यप यांना 13 पत्नी होत्या. यामध्ये कद्रू नावाची एक पत्नी होती. कद्रूने पती महर्षी कश्यप यांची खूप सेवा केली. महर्षी कश्यप तिच्या सेवेवर प्रसन्न होऊन तिला वरदान मागण्यास सांगतात. कद्रूने एक हजार तेजस्वी नाग पुत्रांचे वरदान मागितले. महर्षी कश्यप यांनी वरदान दिले आणि अशाप्रकारे नाग वंशाची उत्पत्ती झाली.


  महर्षी कश्यप यांच्या आणखी एका पत्नीचे नाव विनता होते. पक्षीराज गरुड विनताचे पुत्र आहेत. एकदा कद्रू आणि विनता यांनी एक पांढरा घोडा पाहिला. त्या घोड्याला पाहून कद्रूने घोड्याची शेपटी काळी तर विनताने घोड्याची शेपटी पांढरी असल्याचे सांगितले. या गोष्टींवरून दोघींमध्ये पैज लागली. त्यानंतर कद्रूने आपल्या नाग पुत्रांना शरीराचा आकार छोटा करून शेपटीवर बसण्यास सांगितले ज्यामुळे शेपटी काळी दिसेल. काही नाग पुत्रांनी असे करण्यास नकार दिला. तेव्हा कद्रूने नाग पुत्रांना शाप दिला की, तुम्ही राजा जन्मेजयच्या यज्ञामध्ये भस्म व्हाल. शापाच्या भीतीने नाग पुत्रांनी आईच्या इच्छापूर्तीसाठी आज्ञेचे पालन केले. पैज हरल्यामुळे विनता कद्रूची दासी झाली.


  पुढील स्लाईड्सवर वाचा -
  - का झाले सापांच्या जिभेचे दोन तुकडे ?
  - कोणत्या नागाने केले होते कठोर तप ?
  - राजा जन्मेजयने का केला नागदाह यज्ञ?
  - कोणी थांबवला नागदाह यज्ञ?

 • Nagpanchami 2018 know the epic story of snakes

  यामुळे झाले सापांच्या जिभेचे दोन भाग
  जेव्हा गरुडाला समजले की त्याची आई दासी झाली आहे, तेव्हा गरुडाने कद्रू आणि त्याच्या सर्प मुलांना विचारले की, मी तुम्हाला सही कोणती वस्तू आणून देऊ ज्यामुळे माझी आई तुमच्या गुलामीतून मुक्त होईल. तेव्हा सर्पांनी स्वर्गातील अमृताची इच्छा व्यक्त केली. आपल्या पराक्रमाने गरुडाने स्वर्गातून अमृत कलश आणून कुश (एक प्रकारचे धारधार गवत)वर ठेवला. अमृत पिण्यापुर्वी सर्प स्नान करण्यासाठी गेले तेव्हा इंद्रदेव अमृत कलश पुन्हा स्वर्गात घेऊन आले. हे पाहून सापांनी ते गवत चालण्यास सुरुवात केली, ज्यावर अमृत कलश ठेवला होता. असे केल्यामुळे त्यांच्या जीभीचे दोन तुकडे झाले.

 • Nagpanchami 2018 know the epic story of snakes

  शेषनागाचे कठोर तप
  कद्रूच्या मुलांमध्ये शेषनाग एक होते. त्यांनी कद्रू आणि आपला भावांना सोडून कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने त्यांना वर मागण्यात सांगितले. तेव्हा शेषनागने सांगितले की, माझी बुद्धी धर्म, तपस्या आणि शांतीमध्ये राहावी. शेषनागाची भक्ती पाहून ब्रह्मदेव म्हणाले की, ही संपूर्ण पृथ्वी, वन, समुद्र आणि नगर हलत-डुलत राहतात. तू हे सर्वकाही डोक्यावर अशाप्रकारे धारण कर की हे स्थिर होईल. ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने शेषनाग पृथ्वीमध्ये घुसले आणि आपल्या डोक्यावर पृथ्वी धारण केली. 

 • Nagpanchami 2018 know the epic story of snakes

  जन्मेजयने का केला नागदाह यज्ञ...
  वेळ आल्यानंतर नागराज वासुकीने आपल्या बहिणीचे लग्न ऋषी जरत्कारू यांच्याशी लावून दिले. काही वेळाने मनसादेवी यांना एक मुलगा झाला. त्याचे नाव आस्तिक ठेवण्यात आले. हा मुलगा नागराज वासुकी यांच्या घरात मोठा झाला. च्यवन ऋषींनी या बालकाला वेदांचे ज्ञान दिले. त्यावेळी पृथ्वीवर राजा जन्मेजयचे राज्य होते.  जेव्हा राजा जन्मेजयला आपलं वडील परीक्षित राजाचा मृत्यू तक्षक नागाने दंश केल्यामुळे झाला असल्याचे समजले तेव्हा त्यांनी नागदाह यज्ञ करण्याचा निर्णय केला. नागदाह यज्ञ सुरु होताच सर्व छोटे-मोठे सर्प यज्ञामध्ये येऊन पडू लागले. ऋषीमुनी नाव घेऊन आहुती देत होते आणि भयंकर विषारी सर्प अग्निकुंडात येऊन पडत होते. यज्ञाच्या भीतीने तक्षक नाग इंद्रदेवाकडे जाऊन लपला.

 • Nagpanchami 2018 know the epic story of snakes

  आस्तिक मुनींनी थांबवला नागदाह यज्ञ
  आस्तिक मुनींना नागदाह यज्ञाविषयी समजल्यानंतर ते यज्ञ ठिकाणी गेले आणि त्यांनी यज्ञाची स्तुती चालू केली. हे पाहून जन्मेजय यांनी त्यांना वरदान देण्यासाठी बोलावले. तेव्हा आस्तिक मुनींनी राजा जन्मेजयआकडे यज्ञ बंद करण्याची विनंती केली. सुरुवातीला राजाने नकार दिला परंतु ऋषीमुनींनी समजावून सांगितल्यानंतर ते तयार झाले. अशाप्रकारे आस्तिक मुनींनी धर्मात्मा सर्पांना भस्म होण्यापासून वाचवले.

Trending