Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Nagpanchami 2018 myth and reality about snakes in marathi

MYTH- काय आहे उडणाऱ्या सापाचे सत्य आणि खरंच, साप साप दुध पितात का?

रिलिजन डेस्क | Update - Aug 15, 2018, 12:05 AM IST

प्राचीन काळापासून सापांविषयी विविध मान्यता प्रचलित आहेत. या मान्यतांसोबतच अंधश्रद्धाही आहे, जी प्राचीन काळापासून मनुष्या

 • Nagpanchami 2018 myth and reality about snakes in marathi

  प्राचीन काळापासून सापांविषयी विविध मान्यता प्रचलित आहेत. या मान्यतांसोबतच अंधश्रद्धाही आहे, जी प्राचीन काळापासून मनुष्याला घाबरवत आहे. नागपंचमी (15 ऑगस्ट, बुधवार) च्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सापांशी संबंधित काही रोचक गोष्टी सांगत आहोत.


  साप दुध पितात का ?
  हिंदू धर्मामध्ये सापांना दुध पाजण्याची प्रथा आहे, जी पूर्णपणे चुकीची आहे. जीव विज्ञानुसार, साप पूर्णपणे मांसाहारी जीव आहे. बेडूक, उंदीर, पक्ष्यांची अंडी व इतर छोटे-छोटे जीव खाउन साप पोट भरतात. दुध यांचा नैसर्गिक आहार नाही. नागपंचमीला काही लोक नागाला दुध पाजण्याचा नावाखाली त्यांच्यावर अत्याचार करतात, कारण दुध पाजण्यापुर्वी हे लोक सापाला काहीही खायला देत नाहीत. तहान-भुकेने व्याकूळ झालेला साप दुध पितो, परंतु हे दुध त्याच्या फुप्फुसामध्ये जाते आणि त्याला निमोनिया होतो. यामुळे सापाचा मृत्यू होतो.


  काय आहे उडणाऱ्या सापाचे सत्य?
  खरंच, पृथ्वीतलावर उडणारे साप आहेत, हे वाक्य तुम्ही कोणाच्या न कोणाच्या तोंडून ऐकले असेल. परंतु यामध्ये एक टक्काही सत्य नाही. जीव विज्ञानानुसार उडणारे साप नाहीत. सापाच्या अनेक प्रजाती झाडांवर वास्तव्य करणाऱ्या आहेत. या प्रजातीच्या सापांमध्ये एक नैसर्गिक गुण असतो की, हे साप उडी मारून एका झाडावर दुसऱ्या झाडावर जातात आणि या झाडांमधील अंतरही खूप कमी असते. हे साप एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाताना आपण पहिले तर आपल्याला हे उडणारे साप वाटू लागतात.


  पुढे जाणून घ्या, या सर्व मान्यतांचे सत्य...

 • Nagpanchami 2018 myth and reality about snakes in marathi

  साप जोडीदाराच्या मृत्यूचा बदला घेतात का?
  आपल्या समाजात अशी मान्यता आहे की, एखाद्या व्यक्तीने सापाला मारले तर मृत सापाच्या डोळ्यांमध्ये मारणाऱ्या व्यक्तीचा चेहरा दिसतो. हा चेहरा पाहून सापाचा जोडीदार (नाग किंवा नागीण) त्या व्यक्तीला दंश करून जोडीदाराच्या हत्येचा बदला घेतात. वैज्ञानिक दृष्टीकोनातून ही मान्यता पूर्णपणे अंधश्रद्धेवर आधारित आहे, कारण साप अल्पबुद्धी जीव आहे. सापांची बुद्धी एवढी विकसित नसते की, ते एखादा घटनाक्रम लक्षात ठेवतील आणि बदला घेतील. जीव विज्ञानानुसार, एखादा साप मेल्यानंतर तो शरीरातून एका विशिष्ठ प्रकारचा गंध सोडतो, जो त्या प्रजातीच्या इतर सापांना आकर्षित करतो. या गंधामुळे इतर साप मृत सापाजवळ येतात आणि त्यांना पाहून लोक समजतात की, इतर साप मृत सापाचा बदला घेण्यासाठी आले आहेत.

 • Nagpanchami 2018 myth and reality about snakes in marathi

  साप इच्छाधारी असतात का?
  प्राचीन मान्यतेनुसार काही साप इच्छाधारी असतात म्हणजेच ते स्वतःच्या इच्छेनुसार रूप बदलू शकतात. कधी-कधी हे मनुष्याचे रूपही धारण करतात. जीव विज्ञानानुसार, इच्छाधारी साप ही केवळ मनुष्यांची अंधश्रद्धा असून कोरी कल्पना आहे यापेक्षा जास्त काही नाही. या विषयावर अनेक चित्रपट बनवण्यात आले असल्यामुळे या मान्यतेला बळ मिळते. वास्तवामध्ये ही मान्यता पूर्णपणे निरर्थक आहे.


  खरंच, मणिधारी असतात का साप?
  सापांशी संबंधित एका मान्यतेनुसार, काही साप मणिधारी असतात म्हणजेच यांच्या डोक्यावर एक चमकदार, मौल्यवान आणि चमत्कारी मणी असतो. जीव विज्ञानुसार, ही मान्यता पूर्णपणे अंधश्रद्धेचा भाग आहे. कारण जगभरात आतापर्यंत जेवढ्या प्रकारच्या सापांची माहिती उपलब्ध झाली आहे, त्यामध्ये एकही साप मणिधारी नाही. तामिळनाडूतील इरुला जनजातीचे लोक, जे साप पकडण्यात माहीर आहेत तेसुद्धा मणिधारी साप असल्याचे मान्य करत नाहीत.

 • Nagpanchami 2018 myth and reality about snakes in marathi

  सापांना मिशिसुद्धा असते का?
  असे म्हटले जाते की, काही सापांना मिशी असते. ही पूर्णपणे एक अंधश्रद्धा आहे. जीव विज्ञानानुसार, मिशी असणारे साप नसतातच. ही एखाद्या गारुड्याची शक्कल आहे. सापाला एखादे खास स्वरूप दिल्यानंतर चांगली कमाई होऊ शकते. यामुळे गारुडी घोड्याच्या शेपटीचे केस काढून सापाच्या तोंडावर कुशलतेने शिउन टाकतात. सत्य हे आहे की साप सरीसृप वर्गातील जीव आहेत, यांच्या शरीरावर त्यांच्या जीवनाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये केस येत नाहीत.


  साप कशाप्रकारे संमोहित करतात?
  काही लोकांच्या मतानुसार सापांच्या डोळ्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला संमोहित करण्याची शक्ती असते. ही सुद्धा एक अंधश्रद्धा असून शुद्ध कोरी कल्पना आहे.

Trending