Home | Jeevan Mantra | Dharm | nagpanchami 2018 worship method in marathi

नागपंचमी : अशाप्रकारे करा नागाची पूजा, कधीही सापाची भीती राहणार नाही

रिलिजन डेस्क | Update - Aug 15, 2018, 12:04 AM IST

धर्म ग्रंथानुसार श्रावण शुक्ल पंचमी तिथीला (15 ऑगस्ट, बुधवार) नागपंचमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी नाग मंदिरात भक्तां

 • nagpanchami 2018 worship method in marathi

  धर्म ग्रंथानुसार श्रावण शुक्ल पंचमी तिथीला (15 ऑगस्ट, बुधवार) नागपंचमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी नाग मंदिरात भक्तांची अलोट गर्दी दिसून येते. केवळ मंदिरातच नाही तर घराघरामध्ये नागदेवाची पूजा केली जाते. असे मानले जेते की, जो व्यक्ती या दिवशी नागाची विधिव्रत पूजा करतो त्याला आणि त्याच्या कुटुंबाला कधीही सापाची भीती राहत नाही.


  पूजन विधी
  नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर सर्वात पहिले शंकराचे ध्यान करावे त्यानंतर नाग-नागीण जोडीच्या प्रतिमे ( सोने, चांदी किंवा तांब्यापासून निर्मित)ची पूजा करताना अनंत, वासुकी, शेष, कबल, शंखपाल, पद्मनाथ, धृतराष्ट्र, तक्षक, कालिया या नऊ नागांच्या नामावालीचे नामस्मरण करून फुले, हरभरे, लाह्या वाहाव्या व दुध पाजावे.


  अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम्।
  शंखपाल धार्तराष्ट्रं तक्षकं कालियं तथा।।
  एतानि नव नामानि नागानां च महात्मनाम्।
  सायंकाले पठेन्नित्यं प्रात:काले विशेषत:।।
  तस्मै विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्।।


  - त्यानंतर व्रत-उपवास करण्याचा संकल्प करावा. नाग-नागीण प्रतिमेला दुधाचा अभिषेक करावा. त्यानंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करून अक्षता, गंध, फुल अर्पण करून मिठाईचा नैवेद्य दाखवावा. धूप-दीप लावून खालील स्तोत्र म्हणावे.
  सर्वे नागा: प्रीयन्तां मे ये केचित् पृथिवीतले।।
  ये च हेलिमरीचिस्था येन्तरे दिवि संस्थिता।
  ये नदीषु महानागा ये सरस्वतिगामिन:।
  ये च वापीतडागेषु तेषु सर्वेषु वै नम:।।


  प्रार्थनेनंतर नाग गायत्री मंत्राचा जप करावा
  ऊँ नागकुलाय विद्महे विषदन्ताय धीमहि तन्नो सर्प: प्रचोदयात्।


  पुढील स्लाईड्सवर वाचा, नागपंचमी कथा...

 • nagpanchami 2018 worship method in marathi

  नागपंचमी कथा
  प्राचीन काळी एका नगरात एक शेतकरी आपल्या कुटुंबासह राहत होता. एके दिवशी शेतकरी शेतामध्ये नांगर चालवत असतो. शेत नांगरत असताना नांगराखाली एका नागिणीच्या मुलांचा जीव जातो. मुलांना मृत पाहून नागिणीला खूप दुःख होते. क्रोधामध्ये येऊन नागीण शेतकऱ्याला, त्याच्या पत्नी आणि मुलाला दंश करते. त्यानंतर ती शेतकऱ्याच्या मुलीला दंश करण्यासाठी जाते परंतु शेतकऱ्याची मुलगी दुधाची वाटी घेऊन नागपंचमीच्या व्रत करताना नागिणीला दिसते. हे पाहून नागीण प्रसन्न होते. ती मुलीला वर मागण्यास सांगते. शेतकऱ्याची मुलगी आपल्या आई-वडील आणि  भावाला जिवंत करण्याचा वर मागते. नागीण प्रसन्न होऊन त्या सर्वांना जिवंत करते. तेव्हापासून मान्यता आहे की, श्रावण शुक्ल पंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने नागांकडून कोणत्याही प्रकराची भीती राहत नाही.


  पूजा झाल्यानंतर पुढे सांगण्यात आलेला सर्प सूक्ताचा पाठ करावा...

 • nagpanchami 2018 worship method in marathi

  सर्प सूक्तचा पाठ 
  ब्रह्मलोकुषु ये सर्पा: शेषनाग पुरोगमा:।
  नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीता: मम सर्वदा।।
  इन्द्रलोकेषु ये सर्पा: वासुकि प्रमुखादय:।
  नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीता: मम सर्वदा।।
  कद्रवेयाश्च ये सर्पा: मातृभक्ति परायणा।
  नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीता: मम सर्वदा।।
  इंद्रलोकेषु ये सर्पा: तक्षका प्रमुखादय:।
  नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीता: मम सर्वदा।।
  सत्यलोकेषु ये सर्पा: वासुकिना च रक्षिता।
  नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीता: मम सर्वदा।।
  मलये चैव ये सर्पा: कर्कोटक प्रमुखादय:।
  नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीता: मम सर्वदा।।
  पृथिव्यांचैव ये सर्पा: ये साकेत वासिता।
  नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीता: मम सर्वदा।।
  सर्वग्रामेषु ये सर्पा: वसंतिषु संच्छिता।
  नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीता: मम सर्वदा।।
  ग्रामे वा यदिवारण्ये ये सर्पा प्रचरन्ति च।
  नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीता: मम सर्वदा।।
  समुद्रतीरे ये सर्पा ये सर्पा जलवासिन:।
  नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीता: मम सर्वदा।।
  रसातलेषु या सर्पा: अनन्तादि महाबला:।
  नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीता: मम सर्वदा।।

Trending