नागपंचमी / नागपंचमी : वर्षातून फक्त एकदाच होते 1000 वर्ष जुन्या नागचंद्रेश्वर मूर्तीचे दर्शन

उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात स्थित आहे 11व्या शतकातील अद्भुत मूर्ती

दिव्य मराठी

Aug 05,2019 12:05:00 AM IST

सोमवार, 5 ऑगस्टला श्रावण मासातील शुक्ल पक्षातील पंचमी आहे, यालाच नागपंचमी असे म्हटले जाते. या दिवशी महादेव तसेच नागदेवाची विशेष पूजा केली जाते. नागपंचमीला 12 ज्योतिर्लिंगामधील एक उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराच्या शिखरावर स्थित नागचंद्रेश्वर महादेव मंदिर भक्तांसाठी उघडले जाते. हे मंदिर वर्षातून एकदाच नागपंचमीच्या दिवशी उघडले जाते. मान्यतेनुसार या मंदिरात विराजित नागचंद्रेश्वरचे केवळ दर्शन घेतल्याने कालसर्प दोष आणि दुर्भाग्य दूर होते. याच कारणामुळे प्रत्येक वर्षी नागपंचमीला येथे लाखोंच्या संख्येने भक्त दर्शनासाठी येतात. येथे जाणून घ्या, नागचंद्रेश्वर मंदिराशी संबंधित इतर काही खास गोष्टी...


11व्या शतकातील आहे नाग आसनावर विराजित शिव-पार्वतीची मूर्ती
> नागचंद्रेश्वर मंदिरात 11व्या शतकातील अद्भुत मूर्ती आहे. यामध्ये फणा काढलेले नाग देवता असून नागाच्या आसनावर शिव-पार्वती विराजमान आहेत.


> ही मूर्ती नेपाळमधून येथे आणल्याचे सांगण्यात येते. उज्जैन व्यतिरिक्त जगभरात अशी मूर्ती कुठेही नाही.


> मान्यतेनुसार नागपंचमीला नागदेव या मंदिरात येतात.


> ही मूर्ती मराठाकालीन कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मूर्तीवर शिव-शक्तीचे साकार रूप दिसते.


असे आहे मंदिराचे स्वरूप
> महाकाल मंदिराच्या वरील भागात महादेवाचे एक लिंग स्थित आहे. या शिवलिंगाला ओंकारेश्वर असेही म्हणतात.


> ओंकारेश्वराच्या ठीक खाली महाकालेश्वर ज्योतिर्लिंग स्थित आहे.


> ओंकारेश्वराच्या ठीक वरील भागात नागचंद्रेश्वर मंदिर आहे. हे वर्षातून एकदाच उघडले जाते.

X