नागपूर Murder चा / नागपूर Murder चा Live Video; प्रतिस्पर्धी ऑटोरिक्शा चालकाला काठ्यांनी मारून घेतला जीव

दिव्य मराठी वेब टीम

Nov 10,2018 05:48:00 PM IST

नागपूर - येथे दिवसाढवळ्या एका ऑटोरिक्शा चालकाचा काठ्यांनी मार-मारून त्याचा खून करण्यात आला आहे. आरोपी त्याचेच प्रतिस्पर्धी रिक्शा चालक होते. ही धक्कादायक घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रस्त्यावरच झालेल्या या हत्येच्या वेळी लोक तेथून ये-जा करत होते. पण, कुणाचीही त्यांना रोखण्याची हिंमत झाली नाही. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.


यावरून झाला होता वाद...
- नागपूरच्या नंदनवन परिसरात व्यवसायात वर्चस्वावरून वाद सुरू होता. त्याच वादातून दोन ऑटो रिक्शा चालकांनी मालवाहू ऑटो चालकाचा खून केला. मृतकाचे नाव राजेंद्र देशमुख असे होते तसेच तो मालवाहू ऑटो चालवत होता. राजेंद्र आपल्या परिसरात इतर कुणालाही ऑटो चालवण्यास मज्जाव करायचा. अनेकवेळा त्याने या परिसरात ऑटो चालवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मारहाण सुद्धा केली होती. याच दरम्यान ऑटो चालक गोलू ठाकरे आणि एजाज शेख या दोघांनी राजेंद्रची भेट घेतली.
- काही दिवसांपूर्वीच राजेंद्रने या दोघांच्या मित्रांना बेदम मारहाण केली होती. त्याचाच जाब विचारण्यासाठी ते दोघे आले होते. यावेळी राजेंद्रचा एजाज आणि गोलूसोबत वाद झाला. हे दोघे राजेंद्रचे अपहरण करून त्याला घेऊन गेले आणि त्याला बेदम मारहाण केली. यानंतर राजेंद्रला मरणासन्न अवस्थेत पुन्हा त्याच परिसरात आणले आणि काठ्यांनी मार-मारून त्याचा जीव घेतला. काहींच्या मते, त्या दोघांनी आधीच राजेंद्रचा खून केला आणि त्याच्या मृतदेहाला मारहाण करत होते. एजाज आणि गोलू सध्या फरार असून पोलिस त्यांचा कसून शोध आहेत.

X
COMMENT