आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय टी बी रुग्णालयाजवळच्या इमारतीचे स्लॅब कोसळले, एका रुग्णासह दोघांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - येथील शासकीय बीटी रुग्णालयाजवळ असलेल्या एका इमारतीचे स्लॅब गुरुवारी अचानक कोसळले. प्राथमिक माहितीनुसार, ही इमारत त्वचारोग विभागाची होती. या भीषण अपघातामध्ये एका रुग्णासह दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. सोबतच, किमान 4 जण जखमी झाले आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, देवनाथ बागडे आणि वनिता वाघमारे अशी मृतांची नावे आहेत.
देवनाथ बागडे हे मुळचे सावनेर येथील रहिवासी आहेत. त्यांना सोरायसिसचा त्रास होता. यामुळे दोन दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. सायंकाळी चहा घेण्यासाठी बाहेर आले होते. चहा घेऊन बागडे सुरक्षारक्षकाच्या जागेवर बसले होते. तर वनिता वाघमारे या एका रुग्णाला भेटण्यासाठी आल्या होत्या. अचानक प्रवेशद्वाराजवळील पोर्च कोसळून यात दोघेही ठार झाले. घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णालयात नेण्यात आले. दुसरीकडे जेसीबीच्या सहाय्याने मलबा काढण्याचे कार्य सुरू करण्यात आले.टीबी वॉर्डातील चर्मरोग विभागाच्या इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले आहे. बांधकाम सदोष असल्याने व पोर्चला खांबाचा  आधार नसल्यानेच हा पोर्च कोसळला असा प्राथमिक अंदाज आहे. अचानक झालेल्या या घटनेने रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली. येथे उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.