MahaElection / भाजपचा झेंडा घेऊन फिरताल तर घरात घुसून मारु, नागपूरच्या काँग्रेस आमदाराची धमकी

आमदाराच्या धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, चहुबाजूने होतीये टीका
 

Sep 13,2019 09:46:00 AM IST

नागपूर - जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव सावनेर येथील आमदार सुनिल केदार यांनी भाजप कार्यकर्त्यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे. ते म्हणाले, 'जो कुणी भाजपचा झेंडा घेऊन फिरतील, त्यांना घरात घुसून मारु.' सिलेवाडा येथील एक कार्यक्रमात बोलत होते. आमदार केदार यांच्या धमकीनंतर सावनेरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आमदार सुनिल केदार यांचा हा धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर केदार यांच्यावर टीका होत असून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


नागपूर जिल्ह्यातील सिल्लेवाडा येथे स्टार बसच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. मात्र आयोजकांनी मला कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नसल्याचा आरोप आमदार सुनिल केदार यांनी केला. यावरून भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार आणि काँग्रेस आमदार सुनिल केदार यांच्यात कार्यक्रमातच शाब्दिक वाद झाला. त्यानंतर भाषण करताना आमदार केदार यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना धमकी दिली.


X