आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर्मनीच्या माणसाने नागपूरच्या तरुणीकडून लुटले 5.15 लाख रुपये, पोलिसांत तक्रार दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - नागपूरच्या अजनी पोलिस स्टेशनमध्ये एका तरुणीने 5 लाख 15 हजार रुपयांचा गंडा बसल्याची तक्रार दाखल केली आहे. तिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये आरोपी हा जर्मनीचा नागरिक असल्याचे म्हटले आहे. या दोघांचा संपर्क फेसबूकच्या माध्यमातून झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका आयटी कंपनीमध्ये काम करते. आरोपीने प्रेम आणि लग्नाचे अमिष देऊन सापळा रचत कसा 5 लाखांपेक्षा अधिकचा गंडा घातला याची सविस्तर कैफियत पीडितेने पोलिसांसमोर मांडली आहे.

अजनी पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकारी स्वाती देवधर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची फेसबूकवरून एका कथित जर्मन नागरिकाशी जानेवारी 2019 मध्ये मैत्री झाली होती. दोघांमध्ये रोज चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल सुद्धा सुरू झाले. मैत्री वाढत गेली आणि प्रेमात बदलली. दोघांनी एकमेकांना लग्नाचे आश्वासन सुद्धा दिले. संबंधित तरुणी एका आयटी कंपनीत अभियंता आहे. लग्नाची आश्वासने देऊन झाल्यानंतर आरोपीने आपण जर्मनीवरून एक गिफ्ट पाठवत असल्याचे पीडितेला सांगितले.

गतवर्षी मार्च महिन्यात तरुणीला एका व्यक्तीने दिल्ली विमानतळावरून बोलण्याचा दावा करताना कॉल केला. आपले एक पार्सल आले असून ते मिळवण्यासाठी 30 हजार रुपयांची कस्टम ड्युटी भरावी लागेल असे सांगितले. महिलेने ते सहज दिले. यानंतर संबंधित व्यक्तीने आणखी 4 लाख 85 हजार रुपयांची मागणी केली. तरुणीने सांगितलेल्या बँक खात्यामध्ये ती रक्कम ट्रान्सफर केली. कित्येक महिने उलटल्यानंतर पार्सल मिळाले नाही. सोबतच, जर्मनीवरून बोलणाऱ्या तिच्या प्रियकराने अचानक संपर्क तोडला.

बातम्या आणखी आहेत...