आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nagpur, Gwalior, Sabarmati Stations To Be Smart, 50 Railway Stations Selected Under Pilot Project Will Be Smart

नागपूर, ग्वाल्हेर, साबरमती स्थानके होणार स्मार्ट, पथदर्शी प्रकल्पांतर्गत निवड झालेली 50 रेल्वेस्थानके स्मार्ट होणार

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : देशातील नागपूर, ग्वाल्हेर, साबरमती आणि अमृतसर ही रेल्वेस्थानके स्मार्ट बनवण्यात येणार आहेत. या चारही स्थानकांची निवड पथदर्शी प्रकल्पांतर्गत करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेस्थानक विकास महामंडळाने (आयआरएसडीसी) सोमवारी ही घोषणा केली. आयआरएसडीसीने सांगितले की, इतर ५० स्थानकांचे देखील याच पद्धतीने काम करण्यात येईल. मात्र या स्थानकांच्या नावाबाबत खुलासा झालेला नाही. या चार स्थानकांना स्मार्ट बनवण्याचे काम जून २०२० पासून सुरू होण्याची शक्यता आहे. काम सुरू झाल्यानंतर तीन वर्षांच्या आत या स्थानकांना विमानतळासारखे जागतिक दर्जाचे बनवण्यात येईल. जुलै २०२३ पासून स्मार्ट स्थानकांवरून रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वापरकर्ता शुल्क भरावे लागेल. 'भास्कर'ने यासंदर्भातील बातमी ३० नोव्हेंबरला प्रकाशित केली होती.

स्मार्ट स्थानकांसाठी अदानी, अंबानी मैदानात 

आयआरएसडीसीचे व्यवस्थापकीय संचालक एस. के. लोहिया यांनी सांगितले, स्मार्ट स्थानकांवर प्रवाशांना विमानतळासारखी सुविधा देण्यात येईल. या मोबदल्यात रेल्वेने निश्चित केलेले शुल्क आकारण्यात येईल. यात कंत्राटदार शुल्क निश्चित करण्याचे हस्तक्षेप करू शकणार नाही. या स्थानकांना विकसित करण्यासंदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत अदानी आणि अंबानी यांच्यासह अनेक मोठ्या कंपन्यांनी तयारी दर्शवली आहे. संभाव्य ५० स्थानकांमध्ये मुंबई, दिल्ली, सुरत, डेहराडून, पुद्दुचेरी, तिरुपती आणि वेल्लोर स्थानकांचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. लोहियांनी सांगितले, जून २०२० पर्यंत मध्य प्रदेशातील हबीबगंज आणि गुजरातमधील गांधीनगर स्थानकाचे काम पूर्ण होईल. या स्थानकांच्या कामास विलंब झाला आहे. या दोन्ही स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून वापरकर्ता शुल्क आकारण्यात येणार नाही.

रेल्वे स्थानकांजवळ आता गृहप्रकल्प उभारणार

लोहिया यांनी सांगितले की, अनेक रेल्वे स्थानकांजवळ व्यावसायिक प्रकल्पांसोबतच गृह प्रकल्पदेखील सुरू होतील. यात कमी कालावधीसाठी म्हणजे तीन किंवा पाच वर्षांच्या कराराने घरे दिली जातील. ओला आणि उबर प्रमाणे व्यवसाय करणाऱ्यांना किंवा नोकरी करणाऱ्यांना एका शहरात असताना बदली झाल्यास दुसऱ्या शहरात घर बुक करता येईल. कराराच्या कालावधीनुसार त्याचे भाडे घेतले जाईल.
 

बातम्या आणखी आहेत...