आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका तरुणीने मन चोरल्याची तक्रार घेऊन चक्क पोलिस स्टेशनला पोहोचला युवक; पोलिसांनी केली ही कारवाई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - पोलिस स्टेशनला लोक चोरीला गेलेल्या वस्तू, गुन्हे आणि शोषणाच्या तक्रारी घेऊन येत असतात. परंतु, नागपूरच्या पोलिसांना एका अजब परिस्थितीचा सामना करावा लागला. शहरातील एका पोलिस स्टेशनमध्ये एक तरुण अनोळखी तरुणीची तक्रार घेऊन पोहोचला. त्या मुलीने आपले मन चोरले अशी तक्रार त्याने केली. यासंदर्भात अधिकृत केस फाइल करण्यासाठी तो अडून बसला होता. अखेर पोलिसांना हे प्रकरण सोडवण्यासाठी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत घ्यावी लागली.


पोलिस आयुक्तांनी शेअर केला किस्सा...
> नागपूरचे पोलिस आयुक्त भूषण कुमार उपाध्याय यांनी नुकतेच एका कार्यक्रमात ही घटना शेअर केली. चोरीला गेलेल्या आणि परत मिळवलेल्या वस्तू त्यांच्या खऱ्या मालकांना देण्यासाठी एक प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांशी पोलिस आयुक्तांनी संवाद साधला. चोरीला गेलेल्या वस्तू पोलिस शोधून परत करू शकतात. परंतु, काही लोक अशा तक्रारी घेऊन येतात की पोलिस सुद्धा डोक्याला हात लावतात. त्यांच्या तक्रारीवर काहीच समाधान मिळवता येत नाही.
> काही दिवसांपूर्वी शहरातील एका पोलिस स्टेशनमध्ये एक युवक अनोळखी तरुणीची तक्रार घेऊन पोहोचला होता. त्या तरुणीने आपले मन चोरले असून तिच्या विरोधात केस फाइल करा अशी मागणी त्याने लावून धरली होती. परंतु, अशा प्रकरणांमध्ये पोलिसांना काहीच कारवाई करता येत नाही. कायद्यात त्या प्रकरणात कारवाई करण्याची तरतूद नाही असे त्याला समजावून सांगण्यात आले. तरीही तो ऐकण्यास तयार नव्हता. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात दखल देऊन तरुणाला पोलिस स्टेशनमधून बाहेर हकलून द्यावे लागले.

 

बातम्या आणखी आहेत...