आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईकडून एक महिन्याच्या मुलीचा गळा दाबून खून; गरीबीमुळे करू शकत नव्हते उपचार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - एक महिन्याच्या मुलीचा आईनेच गळा दाबून खून केला. त्यानंतर मुलीचा मृतदेह गाईच्या गोठ्यातील खड्ड्यात टाकून त्यावर शेण टाकले. ही घटना नागपुरातील नवीन कामठी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रनाळा येथे गुरुवारी उघडकीस आली. पायल अनिल कनोजे असे निर्दयी आईचे नाव आहे. दरम्यान, गरिबीमुळे मुलीवर उपचार करू शकत नसल्यामुळे तिचा  खून केल्याची कबुली पायल हिने पोलिसांसमोर दिली आहे.

पायल तिच्या मावशीकडे नवीन कामठी येथे उपचारासाठी आली असता मध्यरात्री तिने हे कृत्य केले. तिचा पती अनिल हा गावोगावी फिरून भंगार वेचण्याचे काम करतो. २८ दिवसांपूर्वी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळंतपणासाठी आॅटोतून दवाखान्यात जात असताना ती बाळंत झाली होती. त्यात नवजात अर्भक खाली पडून जखमी झाले होते. त्यात नवजात बाळाला मुका मार लागला होता. त्यामुळे बाळ सतत रडत राहायचे. मूळचे हे कुटुंब मौदा तालुक्यातील अरोली येथील आहे. उपचारासाठी दिवसाला हजार रुपये लागत होते. १८ सप्टेंबरला आई पायल, वडील अनिल, काका सुनील व आजी असे चौघे कामठीला आले. तिथे करण बर्वेकर यांच्याकडे रात्री मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी परत जाणार होते. बुधवारी मध्यरात्री २ वाजताच्या पायलने बनाव करून मुलगी सापडत नसल्याने गोंधळ सुरू केला. त्यामुळे कुटुंबीयांनी बरीच शोधाशोध करूनही बाळ न सापडल्याने कामठी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. 
 

सासूने खून केल्याचा पायलचा आरोप
पोलिसांनी संशयावरून आई व आजीची चौकशी सुरू केली. त्या वेळी पायल ही उडवाउडवीची उत्तर देऊ लागल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी खाक्या दाखवताच पायलने मुलीचा खून केल्याची कबुली दिली. प्रारंभी पायलने सासूवर तर सासूने पायलवर खून केल्याचा आरोप केला. मात्र, चौकशीअंती आजी निर्दोष असल्याचे आढळल्याचे ठाणेदार बाकल यांनी सांगितले.