आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सख्ख्या आईने एका महिन्याच्या मुलीचा गळा आवळला, मग कचरा कुंडीत फेकून शेनाने झाकला मृतदेह

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - येथील नवीन कामठी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रनाळा येथे एक महिन्याच्या मुलीचा आईनेच गळा दाबून खून केल्याची हृद्रयद्रावक घटना घडली. पायल अनिल कनोजे हे आईचे नाव आहे. मुलीचा मृतदेह आईने गाईच्या गोठ्याजवळ असलेल्या कचरा कुंडीत फेकले आणि त्यावर शेण टाकून मृतदेह लपविला. तिने पोलिसांसमक्ष आपला गुन्हा देखील मान्य केला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


नवीन कामठीचे ठाणेदार संतोष बाकल यांनी घरच्या गरीबीमुळे उपचार करू शकत नसल्यामुळे आईनेच गळा दाबून खून केल्याचे सांगितले. पायल तिच्या मावशीकडे नवीन कामठी येथे उपचारासाठी आली असता मध्यरात्री तिने हे कृत्य केले. तिचा नवरा अनिलहा गावोगावी फिरून भंगार वेचण्याचे काम करतो. २३ दिवसांपूर्वी बाळंतपणासाठी आॅटोतून दवाखान्यात जात असताना दवाखान्याजवळच आॅटोतून बाहेर येताच पायल बाळंत झाली होती. त्यात नवजात अर्भक खाली पडून जखमी झाले होते.