आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ष अखेरीस उड्डाण घेईल नागपूर-शेगाव 'सी-प्लेन'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या 'सी-प्लेन' मार्ग मंगळवारी मोकळा झाला. नागपूर सुधार प्रन्यासच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याची माहिती प्रभारी सभापती आश्विन मुद्गल यांनी दिली. डिसेंबरपासून 'सी-प्लेन'ची सेवा सुरू होईल, असे प्रयत्न आहेत. 


विमानाचे 'टेक आॅफ' व 'लॅन्डिंग'साठी नागपुरातील अंबाझरी, कोराडी अथवा गोरेवाडा यापैकी एका तलावाची निवड करण्यात येणार आहे. नासुप्रची बैठक झाल्यानंतर लगेच 'एमएमबी'कडून (महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्ड) निविदा काढण्यात येतील. मागील बैठकीत उड्डाणाचे स्थान निश्चित करण्यात आले होते. यात पेंच, ताडोबा यांच्यासमवेत शेगाव येथील आनंदसागरचा समावेश आहे. 


सोबतच नजीकच्या भविष्यात पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली इतर स्थानेदेखील जोडण्यात येऊ शकतात. विशेष म्हणजे नागपूरचे वातावरण हे देशातील सर्व विमानतळांत 'आॅल टाईम वेदर' म्हणून ओळखले जाते. विमानांच्या दळणवळणासाठी हे वातावरण अतिशय अनुकूल आहे. यासोबतच तलावांची संख्या देखील जास्त असल्याने सी-प्लेनसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. डिसेंबर महिन्यात ही सेवा सुरु हाेणार असल्यामुळे अनेक नागरिकांना त्याचा लाभ हाेणार अाहे. या उपक्रमामुळे नागरिकांच्या वेळेचीही बचत हाेणार अाहे. 

बातम्या आणखी आहेत...