आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RSS / राष्ट्रनिर्मितीसाठी संघाचे योगदान! नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धडे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - येथील राष्ट्र संत तुकडोजी महाराज विद्यापीठाने आपल्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवकाचा समावेश केला आहे. बॅचलर ऑफ आर्ट्सच्या द्वितीय वर्षात या विषयाचा अभ्यासक्रम आहे. त्यामध्ये राष्ट्रनिर्मितीसाठी आरएसएसने कसे योगदान दिले याचा उल्लेख करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम इतिहास विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू करण्यात आला आहे. बीए करणाऱ्या विद्यार्थ्यांना चौथ्या टर्मच्या परीक्षेत यासंदर्भात प्रश्न विचारले जाणार आहेत. इतिहासातील नवीन प्रवाह म्हणून याचा उल्लेख करण्यात आला असे सांगितले जात आहे.


नागपूर विद्यापीठात अभ्यास मंडळातील सदस्य सतिश चाफळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1885 ते 1947 पर्यंतच्या भारताच्या इतिहासात संघाचा उल्लेख करण्यात आला आहे. बीए करणाऱ्या विद्यार्थ्यांना चौथ्या टर्ममध्ये यावर धडे असणार आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशाच्या निर्मितीसाठी कसे योगदान दिले हे सांगितले जाणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, 2003-04 या शैक्षणिक वर्षात मास्टर ऑफ आर्ट्स (पदव्युत्तर) शिक्षणाच्या अभ्यासक्रमात संघाची प्रस्तावना मांडण्यात आली होती. यावर्षी बीएच्या विद्यार्थ्यांना त्याचा तपशील मिळणार आहे.

 

 


अभ्यासक्रम तर घेतला, संदर्भ कुठून घेणार -काँग्रेस
अभ्यासक्रमातील पहिल्या सेक्शनमध्ये काँग्रेस पक्षाची स्थापना आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासंदर्भात माहिती देण्यात आली. दुसऱ्या सेक्शनमध्ये नागरी चळवळींचा आणि तिसऱ्या सेक्शनमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख आहे. मार्क्सवाद, नवा मार्क्सवाद आणि नवे आधुनिकीकरण हे इतिहासाच्या अभ्यासक्रमाचे नवीन प्रवाह बनले आहेत. त्याप्रमाणेच, आरएसएसचा अभ्यासक्रम सुद्धा त्याच नवीन प्रवाहांचा एक भाग आहे. दरम्यान, काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी नागपूर विद्यापीठाच्या या निर्णयाला विरोध केला. तर राष्ट्रनिर्मितीसाठी आरएसएसच्या योगदानाचा अभ्यासक्रम तर घेतला. पण, त्यांना याबाबतचे संदर्भ कुठून मिळतील असा चिमटा काँग्रेसचे सचिन सावंत यांनी घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...