आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात घराची भिंत कोसळून दोन जण ठार तर एक गंभीर जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - सावनेर मार्गावर बोरुजवाडा येथे एका घराची भिंत कोसळून 2 जणांचा मृत्यू तर 1 गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. मृतांमध्ये एक तरुण आणि एका मुलाचा समावेश आहे तर महिला जखमी आहे. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
बोरुजवाडा येथील या घरात हे लोका भाड्याने राहत होते. मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. दरम्यान शनिवारी सकाळी त्यांच्यावर काळाने झडप घातली. सकाळी साडेपाचच्या सुमारास घराची भिंत कोसळल्याचे दोघांचा मृत्यू झाला. भिंत कोसळल्यानंतर आसपासचे लोक मदतीसाठी धावून आले. या दुर्घटनेत अतुल उईके (वय 17), सुरेश करनरकर (वय 30) हे दोघे मृत्युमुखी पडले तर उर्मिला उईके (वय 50) ही महिला जखमी झाली आहे. सावनेर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.