Home | National | Delhi | Naidu urges Rahul to make the government formula now

लोकसभा निवडणूक : सरकारसाठीचा फॉर्म्युला आताच बनवा; नायडूंचा राहुलकडे आग्रह

वृत्तसंस्था | Update - May 19, 2019, 09:20 AM IST

आव्हान : आघाडी शक्य, पण पंतप्रधानपदाचा दावेदार कोण ?

 • Naidu urges Rahul to make the government formula now

  नवी दिल्ली - टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. उभय नेत्यांनी सुमारे एक तास भाजपविरोधी आघाडीवर चर्चा केली. निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच आपण भाजपला सरकार स्थापन करण्यापासून दूर ठेवण्यासाठी नीती तयार केली पाहिजे. भाजपला बहुमत मिळाले नाही तर आपला दावा करण्यासाठी आपण तयार असले पाहिजे, असे नायडू यांनी राहुल यांना सांगितले. दरम्यान नायडूंनी आतापर्यंत सात पक्ष प्रमुखांची भेट घेतली.


  नायडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, भाकपचे नेते सुधाकर रेड्डी, डी. राजा व एलजेडी नेता शरद यादव यांची शनिवारी दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर ते लखनऊला गेले. तेथे त्यांनी सपा प्रमुख अखिलेश यादव व बसपा प्रमुख मायावती यांचीही भेट घेतली. भाजपच्या विरोधातील आघाडी स्थापन करण्यासाठी नायडूंनी राजधानी गाठली होती. तिसऱ्या आघाडीत भाजपच्या विरोधातील सर्व पक्षांचे आम्ही स्वागत करतो. शुक्रवारी नायडूंनी आपचे संयोजक अरविंद केजरीवाल व माकपचे सरचिटणीस येचुरी यांचीही भेट घेऊन चर्चा केली होती. नायडू या मुद्द्यावर तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवरून संपर्कात आहेत.

  आव्हान : आघाडी शक्य, पण पंतप्रधानपदाचा दावेदार कोण ?
  काँग्रेस:
  पाच वर्षे सरकार चालवण्यासाठी देशातील सर्वात जुन्या व मोठ्या पक्षाला संधी मिळावी, असे पक्षाचे नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटले होेते.

  बसपा : काँग्रेसच्या सत्ताकाळात योग्य दिशेने विकास नव्हता. काँग्रेसने चांगली काम केली असती तर मोदी पंतप्रधान नसते, असे मायावती यांनी म्हटले.

  बीजेडी : काँग्रेस आधी पंतप्रधानपदासाठी एखाद्याला पाठिंबा देते. काही महिन्यांनंतर घूमजाव करते, असे पक्षाचे उपाध्यक्ष सूर्यनारायण पात्रो यांनी म्हटले आहे.

  टीआरएस : पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी गैरभाजप व गैरकाँग्रेस आघाडीसाठी दक्षिणेतील नेत्यांच्या भेटीचा सपाटा लावला आहे.

  रणनीती : कर्नाटकाप्रमाणे केंद्रातही प्रयत्न कर्नाटकात २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष होता. काँग्रेस- दुसरा, जेडीएस-तिसऱ्या क्रमांकावर होते. असे असूनही काँग्रेस-जेडीएसने निवडणुकीनंतर आघाडी केली होती. काँग्रेसने जास्त जागा असूनही जेडीएसच्या एच. डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपदासाठी स्वीकारले होते. हाच फॉर्म्युला विरोधक केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी वापरू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

  व्होट बँक : दिल्लीपासून दक्षिणेपर्यंत धर्मावरून राजकारणाला सुरुवात

  मुस्लिम मते शेवटच्या टप्प्यांत काँग्रेसकडे गेली : केजरीवाल

  दिल्लीत मतदानाच्या काही तास आधी हवा पालटली. मुस्लिम मतदार काँग्रेसकडे गेले, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. केजरीवालांना नेमके काय म्हणायचे आहे कोणास ठाऊक ? इच्छेनुसार मतदानाचा सर्वांना अधिकार आहे, असे शीला दीक्षित यांनी सांगितले.

  हिंदू शब्द आक्रमणकर्त्यांनी दिला, आपण भारतीय आहोत : हसन

  हिंदू शब्दाचा उल्लेख कोणत्याही प्राचीन ग्रंथात सापडत नाही, असे अभिनेता व मक्कल निधी मय्यम पार्टीचे प्रमुख कमल हसन यांनी ट्विट करून म्हटले आहे. हा शब्द परदेशी आक्रमणकर्त्यांनी दिलेला आहे. त्याला धर्माचे नाव देणे चुकीचे ठरेल. आपली आेळख भारतीय आहे.

  भाजपने प्रज्ञा यांना पक्षातून बाहेर काढून राजधर्म निभवावा : सत्यार्थी

  गोडसेने गांधीजींच्या शरीराची हत्या केली होती. परंतु प्रज्ञा ठाकूर यांच्यासारखे लोक त्यांच्या आत्म्याच्या हत्येसह अहिंसा, शांती व सहिष्णुतेचीही हत्या करतात. प्रज्ञा यांना भाजपमधून काढून राजधर्म पाळावा, असे नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी ट्विट केले.

Trending