आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नखं खाण्याच्या सवयीमुळे या आजोबांना झाला इतका गंभीर आजार, आता लोकांना करत आहेत सतर्क

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(ही स्टोरी 'सोशल व्हायरल' सिरीझ अंतर्गत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अशा काही स्टोरीज ज्याबद्दल आपणही जाणून घ्यायला हवे.)

 

डंबरटन - स्कॉटलंडमध्ये राहणाऱ्या एका आजोबांनी कल्पनाही केली नव्हती की नाखं खाण्याची सवय त्यांना इतकी महाग पडू शकते. नखं खाण्याच्या सवयीमुळेच त्यांना अंगठ्यावर एक छोटीशी जखम झाली होती. सुरुवातीला त्यांनी यावर दुर्लक्ष केले. परंतु, काही दिवसांतच ती जखम इतकी वाढली की हात आणि छातीवर सुद्धा त्याचे संक्रमण पोहोचले. परिस्थिती इतकी बिघडली की त्यांचे जीव धोक्यात गेले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांना सेप्सिस (Sepsis) नावाचा रोग झाला होता. हा रोग इतका भयंकर आहे, की एकट्या युनायटेड किंगडमध्ये (UK) या इन्फेक्शनमुळे दरवर्षी 44 हजार लोकांचा जीव जातो. 


औषधीही ठरल्या कुचकामी...
- स्कॉटलंडच्या डंबरटन शहरात राहणारे 57 वर्षीय रिकी केनेडी यांना याच वर्षी मे महिन्यात रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कारण, इतकेच की नखं चावण्याच्या सवयीमुळे त्यांच्या शरीरावर संक्रमण झाले होते. 
- केनेडी यांच्या अंगठ्यावर जखम इतकी वाढली होती की सडल्याने त्याचे संक्रमण हात आणि छातीपर्यंत पोहोचले होते. 
- केनेडी यांनी सांगितल्याप्रमाणे, 'नख चावता-चावता त्यांनी तो नख दातांनी जास्तच ओढला होता आणि स्किन सुद्धा काहीशी फाटली होती. दोन दिवसांतच त्या ठिकाणी एक जखम झाली. सुरुवातीला डॉक्टरांना दाखवले तेव्हा त्यांना अॅण्टीबायोटिक औष देण्यात आले.
- ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतरही काहीच फरक पडला नाही. उलट त्यांच्या अंगठ्यावरील संक्रमण आणखी वाढले. यानंतर त्यांची तब्येत आणखी बिघडली आणि त्यांनी रुग्णालयात दाखल करावे लागले. 


कित्येक वर्षांपासून होती नखं खाण्याची सवय
केनेडी यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी विचारही केला नव्हता की इतक्या छोट्याशा जखमेमुळे त्यांना इतके मोठे नुकसान होऊ शकते. कित्येक वर्षांपासून त्यांना नखं खाण्याची सवय होती. परंतु, हा रोग आताच का झाला हे त्यांना अद्याप कळले नाही. आणखी काही दिवस दुर्लक्ष झाल्यास त्यांचा मृत्यू अटळ होता. सेप्सिसमुळे त्यांची अवस्था इतकी वाइट झाली होती की आपल्याला हार्ट अटॅक येतोय किंवा आताच आपला मृत्यू होणार अशी भीती त्यांना वाटत होती. आपण ही चूक केली. परंतु, दुसऱ्यांनी करू नये यासाठी सोशल मीडियावर आपली कहाणी मांडत आहोत असे त्यांनी सांगितले. सोशल मीडियावर त्यांची ही स्टोरी सध्या व्हायरल होत आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आपल्याला तर नाही ना अशी जखम, वेळीच डॉक्टरांना दाखवा...

बातम्या आणखी आहेत...