आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दातांनी नखे कुरतडण्याची सवय आमंत्रित करते विविध आजारांना, पोटात होऊ शकतो संसर्ग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक लोकांना दातांनी नखे कुरतडण्याची सवय असते. दीर्घकाळ ही सवय असल्यामुळे अनेक आरोग्य समस्या होतात. मुंबई हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉ. मनीष जैन सांगत आहेत, दातांनी नखे कुरतडण्याच्या सवयीच्या दुष्परिणामांविषयी सविस्तर माहिती... 
जाणून घ्या नखे कुरतडण्याच्या दुष्परिणामांविषयी माहिती... 


बॅक्टेरियल संसर्ग : नखे स्वच्छ न ठेवल्याने यामध्ये साल्मोनेला आणि ई कोलाईसारखे बॅक्टेरिया जमा होतात. नखे दाताने कुरतडल्यास हे शरीरात जाऊ शकतात. ज्यामुळे बॅक्टेरियल संसर्गाचा धोका वाढतो. 


त्वचेत संसर्ग : नखे चावल्याने पॅरोनिशिया नामक त्वचेत संसर्ग होऊ शकतो. यामध्ये नखाच्या आजूबाजूच्या स्किनमध्ये बॅक्टेरिया जातात. ज्यामुळे बोटांवर लालसरपणा आणि सूज येते. 


मसची समस्या : रोज नखे खाल्ल्यास बॉडीमध्ये ह्युमन पेपिलोमा व्हायरस (HPV) पसरण्याचा धोका असतो. यामुळे हात, ओठ किंवा तोंडात मस होऊ शकतात. 


दातांची समस्या : नखे चावल्याने यामधील घाण दातांवर जमा होते. यामुळे दात कमजोर होतात त्यांचा नैसर्गिक आकार बिघडतो. 


पोटात संसर्ग : रोज नखे चावल्याने नखांचे बॅक्टेरिया पोटापर्यंत पोहोचतात. यामुळे पोटात संसर्गाचा धोका वाढतो. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...