आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नखे कुरतडण्याच्या सवयीमुळे पोटदुखी आणि अपचनाची समस्या होऊ शकते

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नखे कुरतडणे ही अतिशय वाईट सवय आहे. यावरून आपल्यात कमी आत्मविश्वास असल्याचे दिसून येते. ही सवय सुटली नाही तर यामुळे अस्वस्थता येऊ शकते. > नखातील मळ, घाण पोटात गेल्याने लहान मुलांना आणि प्रौढांना पोटदुखी आणि अपचन यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. > काही जणांना नखांबरोबर त्याच्या बाजूची त्वचा खाण्याचीही सवय असते. यामुळे नखांना नखुर्डे होण्याची शक्यता असते. > नखे खाताना समोरच्या व्यक्तीला किळस येऊन तुमची गणना अस्वच्छ व्यक्तीमध्ये होऊ शकते.

असा करा उपाय
> मोठ्या व्यक्तीने आपल्याला कधी नखे खाण्याची इच्छा होते याचे निरीक्षण करावे, समजा एखाद्या गोष्टीचा ताण आल्यावर किंवा एखाद्या गोष्टीची भीती वाटल्यावर त्यानुसार त्या समस्यांवर उपाय शोधा. अशा परिस्थितीवर शांतपणे विचार करा.

> स्वतःबाबत कोणत्याही प्रकारचा कमीपणा वाटून घेऊ नका. अतिविश्वास बाळगायला शिका. समस्यांना घाबरून न जाता सामोरे जायला शिका.

> कोणत्याही गोष्टींची उत्सुकता असेल त्या वेळी मन शांत ठेवत हात तोंडाकडे जाऊ देऊ नका.

बातम्या आणखी आहेत...