आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओ: फिल्मी स्टाइलमध्ये लग्नमंडपात पोहोचली पत्नी, पाहून नवरदेवला बसला धक्का, मग महिलेने सर्वांसमोर सुरू केली त्याला मारहाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नैनीताल, उत्तराखंड - 24 नोव्हेंबर रोजी लग्नाचा मंडप सजलेला होता. लग्नविधी होत होते, तेवढ्यात तेथे नवरदेवाची पहिली बायको येऊन धडकली. त्यानंतर जे झाले त्यामुळे सर्व वऱ्हाडी मंडळी दंग झाली. भरमंडपात नवरदेवाच्या पहिल्या पत्नीने त्याला अस्मान दाखवले. सर्वांसमोर त्याला यथेच्छ बुकलून काढले. महिलेने नवरीच्या कुटुंबीयांना जेव्हा नवरदेवाचे सत्य सांगितले तेव्हा त्यांनाही धक्का बसला. यादरम्यान घाबरलेला नवरदेव पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याआधीच नवरीच्या कुटुंबीयांनी त्याला पकडून मारहाण सुरू केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नवरदेवाला ताब्यात घेऊन सोबत नेले. या पूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ही घटना नैनीतालच्या सेंटर हॉटेलमधील आहे.

 

पोलिसांच्या मते, मारहाणीमुळे हा नवरेदव गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. लग्न थांबवण्यासाठी महिलेने तिला आपला पती असल्याचे सांगितले आहे. महिला पोलिसांना सांगितले की, तिचा घटस्फोट झालेला असून तिला 8 वर्षांचा एक मुलगाही आहे. 2 महिन्यांपूर्वीच दोघांनी कोर्टात लग्न केले होते. या तरुणाचे नाव मयंक आहे, तो पीएसीमध्ये शिपाई असून सध्या नैनीताल राजभवनात तैनात आहे. पोलिसांनी सांगितले की, सध्या याप्रकरणी चौकशी सुरू असून, त्यावरूनच पुढील कारवाई केली जाईल. 

 

बातम्या आणखी आहेत...