आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 महिलांसह 8 नक्षलींचा खात्मा, 2 जवान शहीद, छत्तीसगडमधील सुकमात चकमक, शस्त्रसाठा जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुकमा (छत्तीसगड) - छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सोमवारी नक्षलवादी आणि सुरक्षा दलांच्या चकमकीत सहा महिलांसह ८ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. गोळीबारात डीआरजीच्या २ जवान शहीद झाले. पोलिसांनी दारूगोळा व दैनंदिन वापराच्या वस्तू जप्त केल्या. किस्टाराम ठाण्यातून पोलिस पथक शोधमोहिमेसाठी रवाना झाले होते. साकलेर गावाजवळील जंगलात टपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तराच्या कारवाईत पोलिसांनी गोळीबार केला. सुमारे एक तास चाललेल्या चकमकीनंतर नक्षलवादी दाट जंगल आणि डोंगराळ भागाकडे पळून गेले. दरम्यान, चिंतागुफा ठाणे क्षेत्रात एलमागुडा गावाजवळ आणखी एक चकमक झाली. यात पोलिसांनी एका जखमी नक्षलवाद्याला अटक केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...