आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भवती पत्‍नीसमोरच धारदार शस्‍त्राने केली पतीची हत्‍या, सास-यानेच दिली होती 10 लाखांची सुपारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- तेलंगणामधील नालगोंडा येथे एका युवकाची 3 दिवसांपूर्वी पत्‍नी आणि आईसमोरच धारदार शस्‍त्राने वार करून हत्‍या करण्‍यात आली होती. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी या प्रकरणी धक्‍कादायक खुलासे केले आहेत.

 

ऑनर किलिंगचे हे प्रकरण असल्‍याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनूसार, युवकाच्‍या सास-यानेच त्‍याला मारण्‍यासाठी 10 लाखांची सुपारी दिली होती. प्रणय असे मृत युवकाचे नाव आहे. त्‍याचे 6 महिन्‍यांपूर्वी उच्‍च जातीच्‍या अमृता या तरूणीशी विवाह झाला होता. अमृताच्‍या घरच्‍यांचा या विवाहाला विरोध होता. पोलिसांनी याप्रकरणी अमृताचे वडील मारूती राव, भाऊ श्रवण कुमार आणि इतर 3 जणांना अटक केली आहे.


सीसीटीव्‍हीत कैद झाला मर्डर
प्रणय तीन दिवसांपूर्वी आपल्‍या 3 महिन्‍यांच्‍या गर्भवती पत्‍नीसह नियमित तपासणीसाठी हॉस्पिटलमध्‍ये गेले होते. यावेळी त्‍यांची आईदेखील त्‍यांच्‍यासोबत होती. हॉस्पिटलमधून बाहेर पडताच कारकडे जात असताना हल्‍लेखोरांनी मागून प्रणयवर कोयत्‍यासारख्‍या हत्‍याराने वार केले. यावेळी आई व पत्‍नीने प्रणयला वाचवण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र तोपर्यंत त्‍याच्‍यावर प्राणघातक वार करून हल्‍लेखोर पसार झाले होते. गंभीर जखमांमुळे प्रचंड रक्‍तस्‍त्राव झाल्‍याने प्रणयचा जागेवरच मृत्‍यू झाला. तर या घटनेचा जबर धक्‍का बसल्‍याने अमृताची शुद्ध हरपली. नंतर तिला रूग्‍णालयात दाखल करण्‍यात आले.


ही ऑन‍र किलिंग, अमृताचा जबाब
याप्रकरणी अमृताने पोलिसांना दिलेल्‍या जबाबामध्‍ये ही ऑनर किलिंग असल्‍याची शंका व्‍यक्‍त केली आहे. तपासादरम्‍यान पोलिसांनाही या हत्‍येसाठी अमृताच्‍या वडीलांनी हल्‍लेखोरांना 10 लाख रुपये दिल्‍याचे समोर आले आहे. तसेच 'या हत्येचा आपल्‍याला काहीच पश्‍चाताप नाही. मुलीपेक्षा मला सन्‍मान अधिक प्रिय आहे', असे अमृताच्‍या वडीलांनी पोलिसांना सांगितले आहे.  


आता कधीही माहेरी जाणार नाही
या हत्‍येनंतर अमृताने सांगितले आहे की, ती आता कधीही वडीलांच्‍या घरी जाणार नाही. आता उर्वरित आयुष्‍य आपण आपल्‍या मुलासोबत प्रणयच्‍या आईवडीलांसोबत व्‍यतीत करणार आहोत, असे अमृताने सांगितले.    

 


 

 

बातम्या आणखी आहेत...