Home | Mukt Vyaspith | Namdev Khedekar Writes About Gopinath Munde & Eknath Khadse relationships

नाथाभाऊ, खरंच आज मुंडे साहेब असते तर? (नामदेव खेडकर)

दिव्‍य मराठी | Update - Jun 06, 2016, 01:06 PM IST

एमआयडीसीमधील जमीन खरेदी, लाचेच्या प्रकरणात अडकले कथित पीए, दाऊदशी संपर्क अशा वेगवेगळ्या आरोपानंतर एकनाथ खडसेंनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तत्पूर्वी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त खडसे यांनी मुंबईत लावलेले होर्डिंग्ज, वर्तमानपत्रे आणि दुरचित्रवाणीवरून दिलेल्या जाहिराती बरेच काही सांगून जातात. 'मुंडे साहेब, आज तुम्ही असता तर...' असा स्पष्ट आणि सूचक मथ�

 • Namdev Khedekar Writes About Gopinath Munde & Eknath Khadse relationships
  एमआयडीसीमधील जमीन खरेदी, लाचेच्या प्रकरणात अडकले कथित पीए, दाऊदशी संपर्क अशा वेगवेगळ्या आरोपानंतर एकनाथ खडसेंनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तत्पूर्वी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त खडसे यांनी मुंबईत लावलेले होर्डिंग्ज, वर्तमानपत्रे आणि दुरचित्रवाणीवरून दिलेल्या जाहिराती बरेच काही सांगून जातात.
  'मुंडे साहेब, आज तुम्ही असता तर...' असा स्पष्ट आणि सूचक मथळा त्यात होता. नाथाभाऊ, तुम्ही संघाच्या नव्हे तर गोपीनाथरावांच्या मुशीत वाढल्याचे वेळोवेळी कबुल केलेत. तुमच्यासाठी मुंडे साहेब पोलिटिकल गॉडफादर होते, हे सर्वश्रुत आहे. या नेत्याबाबत तुम्ही बाळगत असलेली आदरयुक्त भीतीही पत्रकार म्हणून आम्ही पाहिलेली आहे. त्याचे एक उदाहरण असे, की 2012 मध्ये बीडच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी तुम्ही आले होते. मुंडेंना यायला वेळ होता, तोपर्यंत तुम्ही 'साई पॅलेस'ला थांबले होते. एकापाठोपाठ सिगारेट सुरु असतानाच मुंडे 'साई पॅलेस'ला आल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली अन आपण हातातली सिगारेट तात्काळ विझवून बेडवरील गादीखाली लपवली होती.

  आता मूळ मुद्याकडे येऊ. 'मुंडे साहेब, आज असते तर...' आज नेमके काय झाले असते बरं? तुमचे मंत्रिपद कायम राहिले असते? आरोपातून तुम्हाला सुरक्षितपणे बाहेर काढले असते? याचे खात्रीशीर उत्तर मुंडे नसताना कोणीही देवू शकत नाही.

  राजीनामा दिल्यानंतर तुम्ही 'पक्ष माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे' असं रावसाहेब दानवेंच्या साक्षीने सांगितलेत. पण, 'आज मुंडे साहेब असते तर...' या वाक्यातून तुम्हाला स्वपक्षातील लोकांनीच कटकारस्थान रचल्याचे सूचित करायचे होते, हे काही लपून राहिले नाही. शिवाय, संकटकाळात कायम उगवणारे 'बहुजनवादा'चे अस्रही यानिमित्ताने तुम्हाला बाहेर काढायचे होते. पण, मीडिया ट्रायलपुढे तुमचे प्रयत्न जरा थिटे पडले. मीडियाला आता सोशल मीडियाचीही भक्कम साथ आहे. त्यामुळेही कदाचित 'संकटकालीन बहुजनवादा'चा प्रयत्न फसला असेल.
  को.ख.
  भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाल्यानंतर फडणवीसांनी/भाजपने खडसेंचा राजीनामा घेतला. यानिमित्ताने संघीय मानसिकतेने बहुजन नेत्याचा राजकीय बळी घेतला, याची जाणीव आता सो-कॉल्ड बहुजनवाद्यांना होतेय. जर, राजीनामा घेतला नसता तर थोड्याच दिवसात 'खडसे म्हणजे हिमनगाचे टोक आहे. अख्ख भाजप सरकार भ्रष्ट आहे', असं म्हणायलाही या सो-कॉल्ड बहुजनवाद्यांनी कमी केली नसती. जात, धर्म पाहूनच एखाद्या व्यक्ती किंवा पक्षाबद्दल मत बनवणे, हे कोडग्या विचारांचं लक्षण म्हणावं लागेल.
  - नामदेव खेडकर, औरंगाबाद.
  namdev.khedkar@dbcorp.in
  हॅलाे - 9922893358

 • Namdev Khedekar Writes About Gopinath Munde & Eknath Khadse relationships
  गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त खडसे यांनी मुंबईत लावलेले होर्डिंग्ज, वर्तमानपत्रे आणि दुरचित्रवाणीवरून दिलेल्या जाहिराती बरेच काही सांगून जातात.

Trending