आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Names Of Government Officers Gave To The Dog, Police Have Committed Crime And Arrested

चीनमध्ये कुत्र्याला दिली सरकारी अधिकाऱ्यांची नावे, पोलिसांनी गुन्हा ठरवून केली अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनच्या अनहुई प्रांतात राहणाऱ्या एका व्यक्तीने सरकारी अधिकाऱ्यांची चेंगगुआन व शिंगुआन ही नावे कुत्र्याला दिली आहेत. हा गंभीर गुन्हा ठरवून यिंगझोऊ पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही ३१ वर्षीय व्यक्ती डॉग ब्रीडर आहे. तिचे नाव बॅन आहे. त्याने नुकतेच मोबाइल मेसेंजर व्हीचॅटवर त्यांच्या दोन कुत्र्यांची नावे पोस्टमध्ये टाकली होती. यानंतर पोलिसांनी त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून अटक केली आहे. एका पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, चीनमध्ये पाळीव प्राण्यांना सरकारी अधिकाऱ्यांची नावे देणे बेकायदेशीर ठरवले आहे. 
यिंगझोऊ पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी बॅनची तत्काळ चौकशी सुरू केली आहे. शिक्षेपोटी बॅनला प्रशासकीय डिटेन्शन सेंटरमध्ये दहा दिवस थांबावे लागणार आहे. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना लॉ ऑन पब्लिक सिक्युरिटीशी संबंधित तरतुदीनुसार, ही ताब्यात घेण्याची कारवाई असेल. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ‘चेंगगुआन’ शहरी भागातील कनिष्ठ स्तरावरील गुन्ह्यांचा निपटारा करण्यासाठी नियुक्त केलेले अधिकारी आहेत, तर ‘शिंगुआन’ अनौपचारिक सामाजिक कार्यकर्ता आहेत. बॅन यांनी गंमत म्हणून अधिकाऱ्यांची नावे कुत्र्यांना दिली होती.