आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहिदांची तरी जाणीव ठेवा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नमो आपल्या निवडणूक भाषणात आवर्जून शहिदांच्या विधवांचा उल्लेख करत असतात. अर्थात जे सैनिक काँग्रेसच्या कार्यकाळात शहीद झाले ते. सर्वसामान्य जनतेची स्मृती अल्प असते. मला मात्र 1999 चा घटनाक्रम चांगलाच आठवतो. 24 डिसेंबरला काठमांडू विमानतळावरून उडालेले इंडियन एअरलाइन्सचे विमान अपहरण करून काबूलला नेण्यात आले होते. त्यानंतर जवानांच्या विधवांनी या अपहरणातील अतिरेक्यांना मुळीच सोडू नये, असे करणे म्हणजे त्यांच्या हौतात्म्याचा अपमान होईल, अशी मागणी केली. तरीही तेव्हाच्या भाजप सरकारने तीन अतिरेक्यांना सोडले व सन्मानपूर्वक काबूलला पोहोचवून दिले. नमोंना मात्र कुठल्याही गोष्टीचा विवेक बाळगायचे कारण नाही. वाजपेयींच्याच कारकीर्दीत 2001 मध्ये अतिरेक्यांनी 17 डिसेंबर रोजी देशाचा मानबिंदू असलेल्या संसदेवर हल्ला केला त्याचेही काँग्रेस पक्षाने निवडणूक प्रचारात भांडवल केले नाही.