आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Namo Tea Stall News In Marathi, Narendra Modi, Election Commission

\'चाय पर चर्चा\'ला निवडणूक आयोगाचा दणका, निःशुल्क चहा वाटण्यावर बंदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ (उत्तर प्रदेश)- भाजपची 'चाय पर चर्चा' मोहिम संकटात सापडली आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथून आलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने मोदींच्या ब्रॅंडिंगसाठी वाटल्या जाणाऱ्या निःशुल्क चहावर बंदी घातली आहे. निशुल्क चहा वाटणे म्हणजे मतदारांना प्रलोभन देणे आणि आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे, असे मत निवडणूक आयोगाने व्यक्त केले आहे.
काय आहे प्रकरण
लखीमपूर येथे 'चाय पर चर्चा' कार्यक्रमात नागरिकांना निशुल्क चहा वाटण्यात आला होता. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर यावर बंदी घालण्याचा आदेश निवडणूक आयोगाने भाजपला दिला आहे. याप्रकरणी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु, या नेत्यांनी म्हटले आहे, की या कार्यक्रमासाठी आम्ही प्रशासनाकडे अर्ज दाखल केला होता. मात्र आम्हाला परवानगी मिळाली नव्हती.
काय आहे भाजपची भूमिका
आम्हाला अद्याप निवडणूक आयोगाने दिलेला आदेश मिळालेला नाही, असे भाजपचे उत्तर प्रदेश अध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी सांगितले आहे. आम्हाला आदेश मिळाल्यावर आम्ही त्याचे पालन करू. समाजवादी पक्षाने पत्रकारांना डिजिटल डायऱ्या वाटल्या आहेत. त्यावर निवडणूक आयोगाने दुर्लक्ष का केले आहे, असेही वाजपेयी यांनी विचारले आहे.
काय आहे नमो टी स्टॉल
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या ब्रॅंडिंगसाठी भाजपने नमो टी स्टॉल सुरू केले आहेत. मोदी यांचा दावा आहे, की लहान असताना ते रेल्वे स्टेशनवर चहा विकत होते. त्यामुळे याच मुद्द्यावर भाजपने नमो टी स्टॉल सुरू केले आहेत. मोदींची रॅली असली की त्याबाहेर नमो टी स्टॉल सुरू केले जातात. एका रॅलीत तर चक्क चहा विकणाऱ्यांना मोदींनी आमंत्रण दिले होते.