Home | Bollywood | Marathi Cinekatta | Nana Patekar 68th Birthday Know About His Property And Cars

12 कोटींचे फार्महाऊस, 7 कोटींचा फ्लॅट, ही आहे 68 वर्षीय नाना पाटेकरांची प्रॉपर्टी, लग्झरी गाड्यांचे मालक आहे, पण जगतात अतिशय साधे आयुष्य

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 01, 2019, 11:40 AM IST

शेतक-यांसाठी झटणारे नाना पाटेकर आवडीने नव्हे तर गरजेपोटी बनले अभिनेते

 • Nana Patekar 68th Birthday Know About His Property And Cars

  मुंबईः अभिनेते नाना पाटेकर यांनी आज वयाची 68 वर्षे पूर्ण केली आहेत. 1 जानेवारी 1951 रोजी मुरुड जंजीरा येथे जन्मलेल्या नानांनी 1978 मध्ये आलेल्या 'गमन' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. गेल्या चार दशकांपासून ते इंडस्ट्रीत अॅक्टिव आहेत. याकाळआत त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केले. नेटवर्दियर या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, नाना सुमारे 10 मिलियन डॉलर (72 कोटी) प्रॉपर्टीचे मालक आहेत. यामध्ये त्यांचे फॉर्महाऊस, कार आणि इतर संपत्तीचा समावेश आहे. एवढ्या संपत्तीचे मालक असूनदेखील ते अतिशय साधे आयुष्य जगणे पसंत करतात.


  पुण्यात आहे 12 कोटींचे फार्महाऊस...
  - नाना पाटेकर यांच्याजवळ पुण्यानजीकच्या खडकवासलामध्ये 25 एकर जमीन असून येथे त्यांचे फार्महाऊसही आहे. शहरातील गर्दीपासून दूर नाना येथे रिलॅक्स होण्यासाठी येत असतात. दिग्दर्शक संगीत सिवान यांच्या 2008 मध्ये आलेल्या 'एक : द पावर ऑफ वन' या चित्रपटाचे शूटिंग नानांच्या या फार्महाऊसवर झाले होते. येथे नाना गव्हाची शेतीही करतात. येथील त्यांचे फार्महाऊस 7 खोल्यांचे असून एक मोठा हॉलदेखील आहे. येथे त्यांनी अतिशय साध्या पद्धतीचे वूडन फर्नीचर आणि टेराकोटा फ्लोअर करुन घेतले आहे. नानांनी घरातील प्रत्येक खोली त्यांच्या बेसिक स्टाइल आणि गरजेनुसार सजवली आहे. फार्महाऊसच्या अवतीभोवती झाडे लावण्यात आली आहे. येथे ब-याच गायी आणि म्हशीसुद्धा आहेत.


  मुंबईतील अंधेरी येथे आहे 7 कोटींचा फ्लॅट...
  नाना पाटेकरांजवळ मुंबईतील अंधेरी येथे एक फ्लॅट आहे. ते 750 स्क्वेअर फूटांच्या 1 BHK फ्लॅटमध्ये राहतात. हा फ्लॅट त्यांनी 90च्या दशकात केवळ 1.10 लाखांत खरेदी केला होता. आज या फ्लॅटची किंमत 7 कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जाते.


  नाना पाटेकरांजवळ आहे 81 लाखांची ऑडी Q7 कार...
  टाइम्स नाऊ डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, नाना पाटेकरांजवळ 81 लाख रुपये किंमतीची ऑडी Q7 कार आहे. याशिवाय त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यात एक 10 लाखांची महिंद्रा स्कॉर्पियो आणि 1.5 लाख रुपये किंमतीची रॉयल एनफील्ड क्लासिक 350 आहे.


  कधीकाळी रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग पेंट करायचे नाना...
  नाना एक उत्कृष्ट स्केच आर्टिस्‍ट आहेत. ते सुरुवातीच्या काळात मुंबई पोलिसांना गुन्हेगारांचे स्केच काढून देण्यात मदत करायचे. नाना पाटेकर सांगतात, अभिनय क्षेत्रात मी आवडीने नव्हे तर गरजेपोटी आलो होतो. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी ते रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग पेंट कारयेच काम करायचे. ते अप्‍लाइड आर्टमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आहेत.


  शेतक-यांसाठी झटतात नाना...
  नाना पाटेकर नाम नावाच्या संस्थेच्या मार्फत शेतक-यांना मदत करतात. 2015 मध्ये मराठवाडा आणि लातूरच्या दुष्काळग्रस्त शेतक-यांना त्यांनी सरकारआधी मदत केली होती. त्यांनी 100 शेतक-यांच्या कुटुंबीयांना 15-15 हजारांचे चेक दिले होते.

Trending