आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नानांनी केला होता या अॅक्ट्रेससोबत अंगलट करण्याचा प्रयत्न, लग्नानंतर दोन अॅक्ट्रेससोबत होते अफेअर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावंत अभिनेता म्हणून ओळखले जाणारे नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. अलीकडेच झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने नानांवर अनेक खळबळजनक आरोप लावले. हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाच्या सेटवर त्यांनी तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न केल्याचे तनुश्रीने या मुलाखतीत सांगितले. इतकेच नाही तर नाना पाटेकर सेटवर अभिनेत्रींशी असभ्य वर्तन करतात, अनेकींना त्यांनी मारहाण केली आहे. इंडस्ट्रीतील सगळ्यांनाच त्यांच्या या स्वभावाची कल्पना आहे, मात्र त्यांच्याविरुद्ध बोलण्याची हिंमत कोणीच करत नाही, असेही तनुश्री पुढे म्हणाली. 

 

विवाहित असताना मनीषा कोइरालासोबत होते अफेअर... 
संतापी आणि फटकळ स्वभाव असलेल्या नाना यांचे बॉलिवूडमध्ये अनेक किस्से फेमस आहेत. नानांकडे पाहिल्यावर ते रोमँटीकही असतील असे आपणास वाटत नसेल तर ते चुकीचे आहे. एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडच्या दोन लोकप्रिय अभिनेत्री नानांसाठी आपापसात भिडल्या होत्या. 


'अग्निसाक्षी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मनिषा कोईरालाच्या प्रेमात पडले होते नाना...
नाना पाटेकर नेहमीच त्यांच्या रागीट स्वभावासाठी ओळखले जात. पण काही अभिनेत्रींना त्यांच्या हाच स्वभाव प्रेमात पाडत असे आणि त्यातीलच एक आहे मनीषा कोईराला. 'अग्निसाक्षी' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नाना यांचे चित्रपटातील अभिनेत्री मनीषा कोईरालासोबत अफेअर सुरु झाले. नाना त्यावेळी विवाहीत होते तरीसुद्धा त्यांचे अफेअर सुरु होते. त्यांच्या अफेअरबद्दल वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रकाशित होऊ लागल्या होत्या. नानांसारखा कडक व्यक्तिमत्वाचा माणूस अफेअर करेल यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. नानांसाठी मनीषा फारच पझेसिव होती. नानांचे त्यांच्या कोस्टार सोबत जास्त मिळून मिसळून वागणे मनीषाला आवडत नसे.

 

नाना-मनिषा यांच्या अफेअरमुळे अग्निसाक्षी चित्रपट हिट ठरला. दोघांना अनेक चित्रपटाच्या ऑफर यायला लागल्या. मनीषा कोईरालाचे नाना यांच्याशी इतर अभिनेत्रींवरुन भांडण होत असे आणि एक दिवस असा आला जेव्हा नाना आणि मनीषा यांच्यात कायमची दरी निर्माण झाली. 

 

आक्षेपार्ह्य अवस्थेत आढळले होते नाना... 
नाना यांना मनीषाने एका रुममध्ये अभिनेत्री आयेशा जुल्कासोबत आपत्तीजनक अवस्थेत पकडले आणि मनीषा त्यावेळी फार संतापली. प्रकरण हातापाईपर्यंत गेले होते पण नाना पाटेकर यांनी मनीषाला कसेबसे शांत केले. या घटनेनंतर मनीषाने नाना यांच्यावर पत्नीला घटस्फोट देऊन लग्न करण्यासाठी दबाव टाकला, पण नाना काहीही करुन पत्नीला घटस्फोट देण्यासाठी तयार नव्हते. नानांच्या या वागणुकीमुळे मनीषाने कायम नानापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर असे म्हटले जाते की नाना आणि आयेशा जुल्का यांनी लिव-इन मध्ये राहण्यास सुरुवात केली होती, पण नानाच्या संतापी स्वभावामुळे हे रिलेशनही जास्त दिवस टिकले नाही.

 

बातम्या आणखी आहेत...