आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nana Patekar Gets Clean Chit From Mumbai Police In Tanushree Dutta Allegations MeToo

#MeToo: नाना पाटेकर यांना मोठा दिलासा, तनुश्री दत्ताने लावलेल्या आरोपांप्रकरणी क्लीनचिट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशभर गाजलेल्या अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपांप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना क्लीनचिट मिळाली आहे. तनुश्री नानांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. परंतु, त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत असे मुंबई पोलिसांनी गुरुवारी कोर्टात स्पष्ट केले आहे. 10 वर्षांपूर्वी तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यासोबत 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटासाठी आयटम साँग केले होते. त्याच दरम्यान नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. पोलिसांच्या अहवालावर तनुश्रीने संताप व्यक्त केला आहे. यावर साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यापूर्वीच पोलिसांनी अहवाल सादर करण्याची घाई का केली असा सवालही तिने उपस्थित केला.  


वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांना क्लीनचिट देणारा अहवाल पोलिसांनी कोर्टात सादर केला. त्यामध्ये नाना पाटेकर यांची चौकशी करण्यासाठी किंवा तपास पुढे नेण्यासाठी पुरावे नाहीत असे सांगण्यात आले आहे. 35 वर्षीय अभिनेत्री तनुश्रीने जगभरात चर्चित असलेल्या #MeToo कॅम्पेन अंतर्गत आपल्यावर झालेल्या कथित गैरवर्तनाचा खुलासा केला होता. उल्लेखनीय बाब म्हणजे, हॉलिवूड आणि जगभरात कामाच्या ठिकाणी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध 'मीटू' ही मोहिम खूप यशस्वी ठरली. याच मोहिमेत हॉलिवूडच्या असंख्य अभिनेत्रींनी प्रसिद्ध चित्रपट निर्माता हार्वे वीनस्टीनविरुद्ध तक्रार केली. त्याला जेलमध्ये डांबण्यात आले. सोबतच, हॉलिवूड समुदायाने त्याचा बहिष्कार केला. कित्येक बॉस आणि राजकीय नेत्यांचे पद आणि प्रतिष्ठा या मोहिमेने हिसकावली. परंतु, तनुश्रीने केलेल्या तक्रारीच्या बाबतीत तसे घडले नाही.


काय म्हणाली होती तनुश्री दत्ता...
तनुश्री दत्ताने गतवर्षी #MeToo कॅम्पेन अंतर्गत आपल्यासोबत 10 वर्षांपूर्वी झालेल्या गैरवर्तनाची आपबिती मांडली होती. तसेच तिने यासंदर्भात पोलिसांत तक्रार सुद्धा दाखल केली होती. तिने सांगितले होते, की एका आयटम साँगच्या डान्सचे शूटिंग सुरू असताना नाना पाटेकर मुद्दाम जवळ येऊन तिच्यासोबत गैरवर्तन करत होते. तेथे उपस्थित स्टाफकडे तक्रार केली. परंतु, कुणीही तिच्या तक्रारीवर लक्ष दिले नाही. तनुश्रीचे हे आरोप नाना पाटेकर यांनी स्पष्टपणे फेटाळून लावले. सोबतच, तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवून माफी मागावी अशी मागणी केली होती. 

बातम्या आणखी आहेत...