आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेनमेंट डेस्क : नाना पाटेकरला मीटू प्रकरणात पोलिसांकडून मिळालेल्या क्लीन चिटवर तनुश्री दत्ताने नाराजी व्यक्त केली आहे. तिने पोलिस दल आणि कायदेशीर प्रक्रियेवर टिका केली. शुक्रवारी एक वक्तव्य करत तनुश्री म्हणाली, 'भ्रष्ट पोलिस दल आणि कायदेशीर प्रक्रियेने त्यांच्यापेक्षाही अधिक भ्रष्ट व्यक्ती नाना पाटेकरला क्लीन चिट दिली आहे. एक अशी व्यक्ती ज्याच्यावर चित्रपटसृष्टीमध्ये अनेक महिलांना धमकावणे, भीती दाखवणे आणि त्यांचा छळ करण्याचे आरोपदेखील आहेत. या प्रकरणात आमच्या साक्षीदारांना भीती दाखवण्यात आली आणि नकली साक्षीदारांकडून त्यांना गप्प बसवण्यात आले, जेणेकरून केस कमजोर व्हावी.' या प्रकरणात साक्षीदारांनी अद्याप आपले जबाब नोंदवलेले नसतानाही क्लोझर रिपोर्ट दाखल करण्याची घाई का केली? असा प्रश्न तनुश्रीने उपस्थित केला आहे. जर बलात्काराचे आरोपी आलोक नाथ यांना क्लीन चिट मिळाली आणि ते चित्रपटांमध्ये परतले, तर निश्चितच छळाचा आरोप असलेल्या नानासाठीही हे कठीण नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.