आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तनुश्री दत्ताच्या गंभीर आरोपांनंतर चित्रपटाच्या सेटवरुन गायब आहेत नाना पाटेकर? दिग्दर्शकाला पुढे ढकलावी लागली शूटिंगची तारीख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर मोठ्या वादात अडकले आहेत. 'आशिक बनाया आपने' या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नानांवर लैंगिक छळाचा आरोप लावला आहे. रिपोर्ट्सनुसार, या आरोपांनंतर नाना त्यांचा आगामी चित्रपट 'हाउसफुल 4'च्या सेटवर येत नाही. नाना कोरिओग्राफर फराह खान आणि इतक क्रू मेंबर्ससोबत गुरुवारीच जैसलमेरमध्ये दाखल झाले होते. पण अजून सेटवर आलेले नाहीत. खरं तर पहिल्याच दिवसापासून त्यांच्या सीनचे शूटिंग सुरु होणार होते. नाना सेटवर येत नसल्याने चित्रपटाचा दिग्दर्शक साजिद खानने त्यांचे सीन काही दिवसांनी शूट करण्याचा निर्णय घेतला आहे. 


नाना पाटेकरांवर लावले तनुश्रीने हे आरोप... 
नानांनी दहा वर्षांपूर्वी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केलं असा आरोप तनुश्रीने ‘झूम टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत केला होता. नाना पाटेकर यांना आपण रोखले म्हणून त्यांनी संपूर्ण चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मला त्रास दिला. नाना इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी शूटिंग संपवून मी घरी निघाले त्यावेळी माझ्या गाडीवर दगडफेक केली. कुटुंबियांना त्रास दिला. मनसेकडून त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती असे गंभीर आरोप तिने या मुलाखतीत केले होते. 

नाना पाटेकर यांनी माझ्याशी असभ्य वर्तन केलं हे अनेकांनी पाहिलं पण कोणीही माझ्यामागे उभं राहिलं नाही, सगळ्यांनीच केवळ बघ्याची भूमिका निभावली असंही ती म्हणाली. नाना पाटेकर सेटवर अभिनेत्रींशी असभ्य वर्तन करतात, अनेकींना त्यांनी मारहाण केली आहे. इण्डस्ट्रीतल्या सगळ्यांनाच त्यांच्या या स्वभावाची कल्पना आहे, मात्र त्यांच्याविरुद्ध बोलण्याची हिंमत कोणीच करत नाही असंही ती म्हणाली.

 

नाना पाटेकरांनी फेटाळले आरोप... 
‘सेटवर १०० – २०० लोक उपस्थित होते मग सर्वांसमोर मी तिच्याशी गैरवर्तणूक केलं असं ती का म्हणतेय, कोणी काय बोलायचं हे आपण कसं ठरवणार, कोणी काहीही म्हटलं तरी मला जे आयुष्यात करायचं आहे तेच मी करणार’ अशी प्रतिक्रिया नाना पाटेकर यांनी ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.   

 

'हाउसफुल 4' मध्ये झळकणार हे स्टार्स 

- नाना पाटेकर यांच्याव्यतिरिक्त चित्रपटात अक्षय कुमार, बॉबी देओल, कृती सेनन आणि पूजा हेगडे यांच्या 'हाउसफुल 4'मध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. साजिद खान दिग्दर्शित हा चित्रपट ऑक्टोबर 2019 मध्ये रिलीज होऊ शकतो. 

बातम्या आणखी आहेत...