आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 ऑक्टोबरपासून डेबिट आणि क्रेडिट कार्ड बंद होण्याचे सत्य आले समोर, 90 कोटी ATM कार्ड होल्डर्ससंबंधीत बातमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क| 16 ऑक्टोबरपासून मास्टरकार्ड, वीजासोबतच 16 कंपन्यांचे कार्ड बंद होणार असल्याचे वृत्त पुर्णपणे खोटे आहे. RBI च्या CGM जोस कट्टूर यांनी सांगितले की, लोकांनी अशा प्रकारच्या वृत्तांवर लक्ष देऊ नये. ही फक्त अफवा आहे. तुमच्याकडे या कंपन्याचे डेबिट कार्ड असतील तर तुम्ही यामधून पैसे काढू शकाल आणि ऑनलाइन ट्रान्सजेक्शनही करु शकाल. 
सध्या वृत्त आहे की, रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)ने कार्ड बनवणा-या कंपन्यांना असे म्हटले आहे की, भारतीय यूजर्सचा डाटा भारतामध्ये स्टोर करावा लागेल.  यावर वीजा आणि मास्टरकार्डसोबत 16 पेमेंट कपन्या स्टोरेजमुळे खर्च वाढेल या कारणामुळे नकार देत आहेत. 

 

काय आहे पुर्ण प्रकरण?
RBI ने एप्रिलमध्ये नोटिफिकेशन जारी करुन कार्ड कंपन्यांना 6 महिन्यांचा वेळ दिला होता. हा काळा 15 अक्टोबरला पुर्ण होत आहे. RBI नुसार, विदेशी कंपन्या भारतीय यूजर्सचा डाटा भारतात स्टोर करतील. यावर अमेजन, व्हॉट्सअॅप, अलीबाबा सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांसोबतच एकुण 62 कंपन्या तयार झाल्या आहेत. तर मास्टरकार्ड, वीजासोबतच 16 कंपन्यांनी RBIचे नियम मान्य करण्यास नकार दिला आहे. त्यांना फायनेंस मिनिस्ट्रीलाही याप्रकरणी जुडलेले राहण्यास सांगितले आहे. तर RBI ने नवीन वेळ देण्यास नकार दिला आहे. 

 

RBIने दिली ही माहिती 
या संपुर्ण प्रकरणावर RBI शी संबंधीत सुत्रांनी सांगितले की, RBI कधीही लोकांना त्रास देत नाही. अशा प्रकारच्या गोष्टींवर लक्ष देऊ नये. सर्व जसे सुरु आहे तसेच सुरु राहू द्यावे. ऑगस्ट 2018 पर्यंत देशामध्ये 98 कोटी डेबिट कार्ड आणि 4 कोटी क्रेडिट कार्ड होल्डर राहिले आहेत. जर यापुढे काही पाऊल उचलण्यात आले तर याची माहिती दिली जाईल. RBI आणि कंपन्यांच्या या प्रकरणात लोकांना कोणत्याच प्रकारची अडचण होणार नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...