आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​पत्रकारांच्या प्रश्नांना नानांची असे दिले होते उत्तर - 'अरे यार दोन्ही चित्रपटांमध्ये करायला मिळाले नाही, आमचे दुःख आम्हाला माहित'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड डेस्क: अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर सेक्शुअल हरॅशमेंटचा आरोप लावला आहे. नाना पाटेकरांनी याचे स्पष्टीकरण देण्यासाठी प्रेस कॉन्फ्रेंस बोलावली होती. पण नंतर नाना अवघ्या एका मिनिटांसाठी पत्रकारांसमोर आले. ते म्हणाले की, मला वकिलांनी बोलण्यास नकार दिला आहे. यावेळी नाना काहीच बोलले नाहीत. परंतु यापुर्वी त्यांनी मीडियसमोर बिनधास्त बातचित केली आहे. 2015 मध्ये नाना पाटेकरांचा चित्रपट 'वेल्कम बॅक' आला होता. या फिल्मच्या एका प्रमोशन इव्हेंटमध्ये त्यांना रिपोर्टरने विचारले की, गेल्या फिल्ममध्ये तुमच्यासोबत मल्लिका शेरावत होती. यामध्ये न्यू कमर अॅक्ट्रेस आहे. तर तुम्हाला कुणासोबत रोमान्स करुन जास्त एक्साइटिंग वाटले. या प्रश्नाचे उत्तर देताना नाना म्हणाले होते की, "अरे यार, दोन्हीही चित्रपटांमध्ये रोमान्स करायला मिळाला नाही. सोडा यार, आमचे दुःख आम्हाला माहिती." या चित्रपटाच्या अजून एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये नाना पाटेकर अभिनेत्री साक्षी मग्गूसोबत होते. तेव्हा नाना पाटेकर म्हणाले होते की, - जेव्हा साक्षीचे सलेक्शन झाले तेव्हा मी डायरेक्टरला सांगितले - 'मुलगी चांगली आहे. यावर साक्षी म्हणाली मी चित्रपटामध्ये तुमची प्रेमिका आहे. मुलगी का म्हणतात तर मी तिला म्हणाला मुली अॅक्टिंग करायची आहे, त्याचे पैसे मिळतील, ख-या आयुष्यात तर मी काहीच करु शकत नाही.' एवढे म्हणून नाना हसु लागले. नाना पाटेकर आपल्या वन लाइनर्ससाठीही ओळखले जातात. एकदा त्यांना कुणीतरी विचारले की, तुम्ही काळे कपडे का घातले आहेत, तर नाना पाटेकर म्हणाले - हे आपल्या शरीराचे रिफ्लेक्शन आहे. आम्ही मनानेही काळे आहोत आणि कपडेही काळे आहेत... व्हिडिओमध्ये पाहा नाना पाटेकरांचे 9 बोल बच्चन...

बातम्या आणखी आहेत...