आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाना-तनुश्री वाद पेटणार... नाना पाटकेरांनी फेटाळले तनुश्री दत्ताचे सर्व आरोप, म्हणाले - कायदेशीर कारवाई करणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क- अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. अलीकडेच झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने अनेक गोप्यस्फोट केले. 2008 साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले असा आरोप केला होता. #metoo मोहीमेबद्दल बोलताना तिने नानांनी केलेल्या असभ्य वर्तनावर भाष्य केले. नाना पाटेकर यांना आपण रोखले म्हणून त्यांनी संपूर्ण चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मला त्रास दिला. मनसेकडून त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती असे गंभीर आरोप तिने केले आहेत. त्यावेळी कुणीही मला साथ दिली, सगळे बघ्याच्या भूमिकेत होते. मी घरी जात असताना नानांनी माझ्या गाडीवर दगडफेक केली होती, असेही ती म्हणाली.  

 

नाना पाटेकरांनी फेटाळले सर्व आरोप, म्हणाले - कायदेशीर कारवाई करणार... 
तनुश्री दत्ताच्या या आरोपांनंतर आता नाना पाटेकरांनी मौन सोडले आहे. टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत नानांनी तनुश्रीने केलेले सर्व आरोप फेटाळत लावत तिच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले. त्यावेळी चित्रपटाच्या सेटवर उपस्थित असलेल्या लोकांचा आपल्याला पाठिंबा मिळत असल्याचेही ते म्हणाले. या मुलाखतीत त्यांनी लैंगिक शोषणाचा अर्थ काय होतो? असा प्रश्नही केला. ते म्हणाले, सेटवर त्यावेळी माझ्यासोबत 50-100 लोक उपस्थित होते. या प्रकरणावर कशाप्रकारे कायदेशीर कारवाई करता येईल, याचा विचार करत असून लोक काहीही म्हणो, मी माझे काम सुरु ठेवणार, असे नाना म्हणाले.  

बातम्या आणखी आहेत...