आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही दिवसांपासून \'हाऊसफुल-4\' च्या सेटवरुन गायब होते नाना, आता चित्रपट सोडल्याचे वृत्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: सध्या मी टू कॅम्पेनवमुळे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक घडामोडी सुरु आहेत. लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर 'हाउसफुल 4'चे डायरेक्टर साजिद खानही या चित्रपटापासून दूर झाला आहे. बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकरही मोठ्या वादात अडकले आहेत. 'आशिक बनाया आपने' या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नानांवर लैंगिक छळाचा आरोप लावला आहे. यामुळे आता नाना पाटेकरही या चित्रपटापासून दूर झाल्याचे वृत्त आहे. आपल्यावरील आरोपांनंतर सोबत काम करणाऱ्यांची अडचण होऊ नये म्हणून नानांनी चित्रपट सोडल्याचे सांगितले जाते आहे. 

 

अक्षय कुमारने केले होते असे ट्वीट 
अक्षय कुमारनेही सेक्शुअल हरॅशमेंटच्या आरोपांमध्ये अडकलेल्या लोकांसोबत काम करण्यास नकार दिला आहे. अक्षयने आपल्या ट्विटरवर लिहिले की- 
"मी काल रात्रीच देशात परत आलो आहे आणि सर्व वृत्त वाचून खुप परेशान झालो. मी हाउसफुल-4 च्या प्रोड्यूसर्सची तपासणी होईपर्यंत शूटिंग कँसल करण्यास सांगितले आहे. यावर कठोर कारवाई केली गेली पाहिजे. मी कोणत्याही सिध्द अपराधीसोबत काम करणार नाही. ज्याच्यासोबत अत्याचार झाला आहे, त्यांचे बोलणे ऐकायला हवे आणि त्यांना न्याय मिळायला हवा."

 

साजिदनेही सोडला 'हाउसफुल 4', केले असे ट्वीट 
साजिद खाननेही ट्विटर हँडलवर एक पोस्ट करुन स्वतःला सर्व डायरेक्टरच्या पोस्टमधून दूर केले आहे. त्याने लिहिले की, "माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमुळे माझे कुटूंब, मित्र आणि माझ्या फिल्मच्या मेंबर्सला दुःख पोहोचले आहे. जोपर्यंत सत्य समोर येत नाही तोपर्यंत मी चित्रपटापासून दूर जाणे हीच माझी जबाबदारी आहे. मी मीडिया आणि मित्रांना एकच अपील करतो की, जोपर्यंत सत्य समोर येत नाही, तोपर्यंत माझ्याविषयी काहीच जजमेंट देऊ नका."

 

बातम्या आणखी आहेत...