आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तनुश्री दत्ताविरोधात नाना पाटेकर दावा ठोकणार; चित्रिकरणावेळी छेडखानी केल्याचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केलेले छेडखानीचे आरोप फेटाळून लावत नाना पाटेकर यांनी तिच्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आहे. माजी मिस इंडिया तनुश्री दत्ता तसेच नाना पाटेकर यांनी २००९ मध्ये 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नानांनी आपल्यासोबत छेडखानी केल्याचा तनुश्रीचा आरोप आहे. 


नानांनी तिचे हे आरोप फेटाळत म्हटले की, तनुश्री असे आरोप का लावत आहे आणि असे का बोलत आहे याविषयी मला माहीत नाही. सेटवर माझ्यासोबत ५०-१०० लोक होते. लैंगिक शोषणाचा तिचा संदर्भ नेमका काय? मी तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे. पण सर्व बाबी माध्यमांना सांगून काही फायदा नाही. उगाच गवगवा नको. ज्यांना जे म्हणायचे ते म्हणू द्यावे. मी माझे काम करत राहील. दरम्यान, नानांचे महिलांच्या छेडखानीशी जुने नाते आहे. त्यांनी अभिनेत्रींवर हातही उगारल्याचेही तनुश्रीने म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर नाना-तनुश्री वादाची जोरदार चर्चा सुरू आहे. 

बातम्या आणखी आहेत...